गृहरक्षक दलाच्या जखमी जवानास २५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान

मुंबई : खालापूर (जि. रायगड) पोलीस ठाणेअंतर्गत दरोडा प्रतिबंधक पथकात कर्तव्यावर कार्यरत गृहरक्षक दलाचे जवान लक्ष्मण विठ्ठल आखाडे यांचा मुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावर ५ सप्टेंबर २०२२ रोजी रात्री दीड वाजता अपघात झाला. या अपघातात त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झाले. त्यांना एचडीएफसी बँकेतर्फे विमा योजनेंतर्गत मंजूर झालेल्या २५ लाख रुपये रकमेचा धनादेश गृहरक्षक दलाचे महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

गृहरक्षक दलाच्या जवानांना विमा संरक्षण प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्रातील ४६ हजार ३३४ जवानांचे बचत खाते उघडून त्यांना विमा संरक्षण व अन्य सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आखाडे यांना कायमस्वरूपी अपंगत्व प्राप्त झाल्याने मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार त्यांना मदतीचा धनादेश अनुज्ञेय झाला.

यावेळी अपर पोलीस महासंचालक तथा गृहरक्षक दलाचे उपमहासमादेशक ब्रिजेश सिंह, रायगडचे अपर पोलिस अधीक्षक तथा गृहरक्षक दलाचे जिल्हा समादेशक अतुल उत्तमराव झेंडे, एचडीएफसी बँकेचे संदीप कोचर, क्लेम सेटलमेंट व्यवस्थापक मंजरी सावंत आदी उपस्थित होते.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणूक 28, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारीला दारु विक्री बंद

Thu Jan 19 , 2023
नागपूर : महाराष्ट्र विधान परिषद व्दिवार्षिक निवडणुकीसाठी 2 पदवीधर तसेच 3 शिक्षक मतदारसंघाची दिवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. जिल्ह्यात निवडणुकीचे मतदान 30 जानेवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत व मतमोजणी 2 फेब्रुवारीला होणार आहे. 28, 30 जानेवारी व 2 फेब्रुवारी या तीनही दिवशी दारु विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिले आहेत. महाराष्ट्र विधान परिषद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com