पारशिवनी :- तालुकातिल पो.स्टे . पारशिवनी अंतर्गत पुर्वेस ०६ कि . मी . अंतरावरील मौजा नयाकुंड शिवार येथे रात्रि ०७.२० वा . ते ०८.५० वा सुमारास धर्मकाटा यातील धाड टाकुन आरोपी मालक क्र . १ ) उमेश पानतावणे , रा . कन्हान यांच्या मालकीचे धर्म काटयात आरोपी क्र . २ ) भागवत सोनबाजी निंबोने , रा . नयाकुंड , ३ ) हेमराज आत्माराम गजभिये , रा . खंडाळा डुमरी यांचे ताब्यात दगडी कोळसा अंदाजे ६० टन किंमती अंदाजे ०४,८०,००० / – रू . व शेल दगड अंदाजे २० टन , ०२ वजन काटे प्रत्येकी ५००० / – रू . प्रमाणे किंमती अंदाजे १०,००० / – रू . अंदाजे २०० किलो दगडी कोळसा किमती अंदाजे १६०० / – रू . , ०५ खाली बारदाने किंमती १०० / – रू.असा एकुण ०४,९१,७००/ – रूपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने तसेच आरोपीतांनी सदरचा दगडी कोळसा डब्लु . सी . एल . मधुन खरेदी केले बाबत कोणतेही वैध कागदपत्र सादर केले नाही व आरोपी क्र . ०२ ) भागवत सोनबाजी निंबोने , रा . नयाकुंड याने सदरचा कोळसा डब्लु . सी . एल . मधुन चोरी करून आणल्याचे सांगितले . सदर प्रकरणी फिर्यादी नामे – पोलीस हवालदार प्रभाकर झोड पोस्टे . पारशिवनी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे . पारशिवनी येथे गुन्हा नोद करून तिन ही आरोपीतां विरुध्द कलम ३७९ , १०९ , ३४ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सोनवने , पो . स्टे . पारशिवनी हे करीत आहे .
नयाकुड येथिल धर्मकाटा येथुन ४ लाख ९१ हजारा चा कोळशा व साहित्य जप्त करून मालकासह तिन आरोपी वर गुन्हा दाखल.
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com