सार्वजनिक रस्त्यावर विना परवानगी बोअरवेलचे काम करणाऱ्यावर गुन्हा दाखल  

चंद्रपूर  :- उत्तम नगर बंगाली कॅम्प येथे सार्वजनिक रस्त्यावर महानगरपालिकेच्या परवानगीशिवाय सुरु असलेल्या बोअरवेलचे काम बंद करवुन बोअरवेल करवून घेणारे व करुन देणारे कंत्राटदार या दोघांविरुद्ध रामनगर पोलिस स्टेशन येथे मनपामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवार दि. १३ मे रोजी मनपा उपद्रव शोध पथकास उत्तम नगर येथे अवैधरीत्या बोअरवेलचे काम सुरु असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार पाहणी केली असता खोब्रागडे यांच्या मालकीच्या देशी दारू दुकानाजवळ मनपाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता सार्वजनिक रस्त्यावर बोरींगचे काम सुरु केले असल्याचे आढळले. अवैधरीत्या बोअरवेलचे काम करीत असल्याने सार्वजनीक मालमत्तेस नुकसान करीत असल्याचा ठपका ठेऊन काम बंद करविण्यात आले तसेच दुकानदार व बोअरवेल करवून देणारे कंत्राटदार या दोघांविरुद्ध रामनगर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

पाण्यासाठी बोअरवेल खोदण्याचे प्रमाण शहरात याआधी मोठ्या प्रमाणात झाले आहे.सातत्याने पाण्याची कमी होणारी पातळी पाहता मनपातर्फे बोअरवेल खणन होऊ नये यादृष्टीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत तसेच ज्यांच्याकडे विहीर, बोअरवेल आहे त्यांना रेन वॉटर हार्वेस्टींग करणे बंधनकारक केले आहे.ठराविक कालावधीत रेन वॉटर हार्वेस्टींग न केल्यास त्यांना २० हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भारत विकास परिषदेची संकल्प कार्यशाळा संपन्न, भाविपचे १२ स्थायी प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय

Mon May 15 , 2023
नागपूर :- सेवा क्षेत्रात कार्यरत देशातील सगऴ्यात जुनी सेवाभावी स्वयंसेवी संघटना असलेल्या भारत विकास परिषदेची संकल्प कार्यशाळा नागपुरातील श्री अग्रसेन भवनात पार पडली. या कार्यशाळेत विदर्भात संपर्क-सहयोग-संस्कार-सेवा आणि समर्पण या पंचसूत्रीच्या माध्यमातून आगामी वर्षात १२ स्थायी प्रकल्प सुरु करण्याचा संकल्प करण्यात आला. भारत सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग कमिशनचे सदस्य जयप्रकाश गुप्ता यांच्या हस्ते संकल्प कार्यशाळेचे दीप प्रज्वलन करुन उद्घाटन करण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!