रस्त्यावरील कुत्रे निर्दयीपणे मारून क्रुतेने वाहनात भरून नेणा-या विरूध्द गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– घटनेचा विडिओ वायरल झाल्याने आर ए डी संस्थे व्दारे कन्हान पोस्ट ला तक्रार

कन्हान :- नगरपरिषद अंतर्गत रस्त्यावरील कुत्र्याना निर्दयीपणे मारून रक्त बंबाळ अवस्थेत कुरतेने चारही पाय व तोंड बांधुन वाहनात टाकुन नेणा-याचा विडिओ वायरल झाल्याने आरएडी बहुउद्देशिय संस्थेच्या तक्रारी वरून कन्हान पोस्टे ला कंत्राट देणारे, कंत्राट घेणारा कंत्राटदार व वाहन चालक अश्या तिन लोका विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास व कार्यवाही कन्हान पोलीस करित आहे.

बुधवार (दि.२८) फेब्रुवारी ला कन्हान नगर परिषद परीसरात रस्तावरील कुत्र्याना बेधम मारहान करून रक्त बंबाळ स्थितीत क्रुरतेने त्यांचे चारही पाय, तोंड बांधुन नविन नगरपरिषद इमारती सामोर टाटा एस मिनी ट्रक क्र.एमएच ३१ सीबी ५९३२ या वाहनात भरून नेणा-यांचा विडिओ सोसल मिडियावर व्हायरल झाल्याने आर ए डी बहुउद्देशिय संस्थाचे अंकीत निलकंठ खळींदे राह. वाठोडा नागपुर यांनी घटनास्थ ळी पोहचुन प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन या प्रकरणी दोषी कंत्राट देणारे, कंत्राट घेणारे व वाहन चालक अश्या सर्वावर गुन्हा दाखल करून त्यांनी त्या मुक्या प्राणी कुत्र्याना जिथेही नेऊन सोडले असेल तेथुन परत आणुन त्याचा उपचार करून पुर्वरत अधिवासात सोडण्यात यावे, तसे न केल्यास प्राणी हत्येचा सुध्दा गुन्हा दाखल करण्याच्या तक्रारी वरून कन्हान पोस्टे ला १) दिनेश दिवाकर राऊत वय ३२ वर्ष रा. रामनगर पिपरी, २) हरिश जयराम तिडके वय ४० वर्ष रा. शिवा जी नगर कन्हान, ३) अजय बकाराम चव्हाण वय ४८ वर्ष रा पिपरी कन्हान यांचे विरूध्द कलम ११९ प्राण्याना कुरतेने वागवणुक मुंबई पोलीस अधिनियम १९६० कायदा, ४२८, ३४ भादंवि अन्वये नुसार गुन्हा दाखल करून तीनही आरोपीना ताब्यात घेऊन पुढील तपास कन्हान थानेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक समस्या  सोडविण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Fri Mar 1 , 2024
मुंबई :- ऊसतोड कामगारांच्या मुलांचा शिक्षण आणि आरोग्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. याबाबत जिल्हा पातळीवर होणाऱ्या कार्यवाही संदर्भात तातडीने बैठक घेऊन आढावा घेण्याच्या सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी या समस्यांबाबत लवकरच आढावा घेणार असल्याचे सांगितले. ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी चालवल्या जाणाऱ्या साखरशाळा आणि आरोग्य याविषयी बुधवारी विधान परिषदेत पुरवण्या मागण्यांवर चर्चेदरम्यान सदस्य सुरेश […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com