मौदा :- मौदा पोलीस पेट्रोलींग करत असातांना पोलीसांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की भंडारा कडुन नागपूर कडे काही गाड्यांमध्ये अवैधरित्या जनावरे भरून कत्तलीकरिता वाहतुक केली जात आहे. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीसांनी नाकाबंदी केली असता भंडारा ते नागपूर रोड, मौजा वडोदा शिवार, झुल्लर फाटा, कामठी येथे ट्रक क एम.एच. ४० बी.जे. ५४९८ मिळुन आल्याने वहनास थांबवुन वाहन आरोपी चालक नामे मुसा अमान नसीम अक्तर वय २३ वर्षे रा. वारीसपुरा, कामठी, जि नागपुर याला विचारपुस करून वाहनांची पंचासमक्ष पाहणी केली असता वाहनाच्या डाल्यामध्ये २५ गोवंश जनावरे कुरतेने शिंगाला व पायाला आखुड दोरखंडाने बांधुन निर्दयतेने चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीकरिता वाहतुक करतांना मिळुन आल्याने घटनास्थळावरून पंचासमक्ष ट्रक क एम.एच. ४० बी.जे. ५४९८ किंमत १०,००,०००/- आणि २५ गोवंश जनावरे किंमत २५०,०००/- रूपये प्रमाणे एकुण किमती १२,५०,०००/- रूपयें असा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच दिनांक ०१/१०/२४ चे २२/१८ ते ०४/०० वा. गुमथळा शिवार, हल्दीराम कंपनी गेट क ४ समोर, कामठी येथे सुध्दा पिकप वाहन क एम.एच.३६ एए ३२४१ मिळुन आले सदर वाहनास थांबण्यास इशारा केला असता आरोपी चालक नामे १ तुलसीराम नागरीकर वय २५ वर्षे रा. संजय नगर, लाखोरी रोड, लाखनी जि भंडारा हा वाहन कडेला लावुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला त्याच्या सोबत असलेला आरोपी नामे २. रोहीत रमेश गभणे बाजार वार्ड, लाखणी, याला विचारपुस करून वाहनांची पंचासमक्ष पाहणी केली असता वाहनाच्या डाल्यामध्ये १२ गोवंश जनावरे कुरतेने शिंगाला व पायाला आखुड दोरखंडाने बांधुन निर्दयतेने चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तलीकरिता वाहतुक करतांना मिळुन आल्याने घटनास्थळावरून पंचासमक्ष ट्रक क पिकप वाहन क एम.एच.३६ एए ३२४१ किंमत ५,००,०००/- आणि १२ गोवंश जनावरे किंमत १२०,०००/- रूपये असा एकुण मुददेमाल ६,२०,००० रूपयें असा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपी विरूध्द पोस्टे मौदा येथे प्राण्यांना निर्देयतेने वागविण्याचा कायदा अन्वये दोन गुन्हे नोंद करण्यात आलेला आहे. तसेच पुढील तपास मौदा पोलीस करत आहेत.
सदरची कार्यवाही हर्ष ए. पोद्दार पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, संतोष गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस स्टेशन मौदा चे ठाणेदार पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, पोलीस हवालदार राजेंद्र गौतम, पोलीस अंमलदार अतुल निंबार्ते, शुभम ईश्वरकर, प्रणय बनाफर स्टॉप यांनी पार पाडली.