हातात धारदार शस्त्र बाळगून दहशत माजविनाऱ्यावर गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी नागपूर महामार्गावरील व्ही टी बार जवळ तीन तरुण हातात धारदार शस्त्र बाळगून कोणतातरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या इराद्याने नियोजित असता गस्तीवर असलेल्या जुनी कामठी पोलिसांनी वेळीच या तरुणांना ताब्यात घेऊन त्याच्याकडील धारदार शस्त्र जप्त करीत त्याविरुद्ध भादवी कलम 4/25,भारतीय हत्यार कायदा,34,सहकलम 134,मपोका, सहकलंम 184/177 अनव्ये गुन्हा दाखल करून आरोपिकडून 2 लक्ष 5 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची यशस्वी कामगिरी मद्यरात्री दीड दरम्यान केली.

अटक तीन आरोपी कडून एक मोठा लोखंडी धारदार चाकू किमती 100 रुपये,एक लहान लोखंडी चाकु किमती 100 रुपये,वेगवेगळ्या कंपनीचे 5 मोबाईल किमती 1 लक्ष 55 हजार रुपये, हिरो स्प्लेंडर दुचाकी क्र एम एच 31 के आर 3497 किमती 50 हजार रुपये असा एकूण 2 लक्ष 5 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अटक तीन आरोपीमध्ये प्रिन्स सोनेकर वय 21 वर्षे रा जरीपटका नागपूर,नरेश ठाकरे वय 42 वर्षे रा कन्हान,आकाश गायकवाड वय 23 वर्षे रा येरखेडा कामठी असे आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त श्रवण दत्त ,एसीपी नलावडे यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे,पोलीस उपनिरीक्षक केरबा उर्फ आकाश माकने,डी बी स्कॉड चे दिलीप ढगे,श्रीकांत विष्णुरकर,धर्मेंद्र राऊत, अंकुश गजभिये यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत ७७० क्षय रुग्णांना पोषण आहार कीटचे वाटप

Wed Jan 4 , 2023
– निक्षय मित्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले १०० रुग्णांचे पालकत्व  -पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानात मनपाचा पुढाकार नागपूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत येत्या वर्ष २०२५ पर्यंत ‘क्षयरोग मुक्त भारत’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. या अनुषंगाने आतापर्यंत नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ७७० क्षय रुग्णांना पोषण कीटचे वितरीत करण्यात येत असून, याकरिता ४९ निक्षय मित्रांची नोंदणी झालेली आहे. हे निक्षय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com