कळमेश्वर :- येथील फिर्यादीची आरोपी बबलू ठाकूर, रा. गोरखपूर उत्तर प्रदेश याचे सोबत गेल्या ६ महिन्यापूर्वी ओळख होवून त्यांच्यात मैत्री होवुन प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला ऑफिसला ड्युटी लावून देतो असे म्हणून फिर्यादी व आरोपी हे रिलेशनशीपमध्ये आले. त्या दरम्यान ते कुठे फिरायला गेले असता, तेव्हा त्यांनी एकमेकांसोबत काही फोटो आरोपीचे फोनमध्ये काढले. त्यानंतर आरोपी हा फिर्यादीवर संशय घेत असल्याने त्यांचे दोघामध्ये झगडा भांडण होत असे. त्यामुळे फिर्यादीने आरोपीसोबत बोलणे व सर्व कॉन्टॅक्ट, बंद केले, तसेच फिर्यादीची आरोपीसोबत बोलण्याची ईच्छा नसल्याचे पिडीतेने सांगितले असून सुद्धा तो त्याचे दुसऱ्या नंबरवरून फिर्यादीला फोन मॅसेज करून तिला बोलण्याचा प्रयत्न करून तिचा छुपा पाठलाग करित असे. आरोपीने फिर्यादीचे नावाची फेक इन्स्टाग्राम आयडी बनवुन त्यावर त्याचे तिचेसोबत असलेले फोटो व विडिओ ईन्स्टाग्रामवर अपलोड करून ते फिर्यादीचे नातेवाईकांना पाठवुन फिर्यादी / पिडीतेची समाजात बदनामी केली आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. कळमेश्वर येथे आरोपीविरुद्ध कलम ३५४, ५०६, ६६ सी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचा पुढील तपास परि पोलीस उपनिरीक्षक मनोज टिपले हे करीत आहे.