घरफोडी करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर :- दिनांक २१.०८.२०२३ चे १२.१५ वा. ते दिनांक २१.०८.२०२३ ते १३.३० वा. दरम्यान पो. ठाणे प्रतापनगर हद्दीत, प्लॉ नं. १५९ पांडे ले-आउट, तिसरा माळा, प्रिया अपार्टमेंट, प्रतापनगर, नागपुर येथे राहणारे फिर्यादी असमानयन श्रीगोविंद तिवारी, वय ७४ वर्षे, हे आपले घराचे मुख्य दाराला कुलूप लावून पत्नीसह डोळे तपासण्याकरीता महात्मे हॉस्पीटल येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराने कुलुप तोडुन घरात प्रवेश करून घरातील आलमारी उघडुन त्यामध्ये ठेवलेले सोने, चांदीचे दागिने, आणि रोख २५,०००/- रु. असा एकूण किंमती अंदाजे १,५६,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे प्रतापनगर येथे पोउपनि चामले यांनी अज्ञात आरोपी विरुध्द कलम ४५४, ३८०, भादवि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Nagpur SIC directs chief secretary to probe complaints against Mundhe

Tue Aug 22 , 2023
– Pande upset over lack of action in three year Nagpur :- State Information Commissioner (SIC), Nagpur bench, Rahul Pande has directed the chief secretary of Maharashtra to probe two long pending complaints against former Nagpur municipal commissioner Tukaram Mundhe. Pande in its order has expressed anguish that no action has been taken by the police and top government officers […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!