नागपूर :-फिर्यादी रजनीगंधा दिपक गायकवाड वय ४९ वर्ष, रा. ६/१ बंगलो यार्ड, रेल्वे कॉलोनी, बिलासपूर, छत्तीसगड, यांच्या सासु पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत प्लॉट नं. १५७. जुनी ठवरे कॉलोनी, ललीतकला भवन जवळ, जरीपटका, नागपूर येथे राहतात. दिनांक १०.०८.२०२४ चे १२.०० वा. ते दिनांक २०.०९.२०२४ ये १२.४५ वा. ये दरम्यान, फिर्यादीच्या सासु ह्या आपले घराला कुलूप लावुन त्यांचे मुलाकडे बिलासपूर येथे गेल्या असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीने सासुचे घराचे मुख्य दाराचे कडी कोंडा, कुलूप तोडुन, आत प्रवेश करून, बेडरूम मधील लोखंडी आलमारीतुन सोन्याचे दागिने एकुण किंमती अंदाजे ५,००,०००/- रू. चा मुद्देमाल चोरून नेला.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे सपोनि. तायडे यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१ (४) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करून, पुढील तपास करीत आहे.