घरफोडी करणाऱ्या आरोपी गुन्हा दाखल

कळमेश्वर :- अंतर्गत ०२ किमी अंतरावर गायकवाड ले आऊट कळमेश्वर येथे दिनांक ११/१२/२०२३ चे ००.०० वा. ते दि. १२/१२/२०२३ चे ०२.०० वा. दरम्यान फिर्यादी नामे शेख सत्तार शेख सरदार (सौदागर) वय ६० वर्ष, रा. गायकवाड ले आऊट कळमेश्वर हा त्याच्या परीवारासह नागपुर येथे कार्यक्रमाला गेला असता कोणीतरी अज्ञात चोराने घराचे आत प्रवेश करुन बेडरुम मधील लाकडी आलमारी मधुन १) सोन्याचा गोप २० ग्रॅम किंमती २०,०००/-रु, २) सोन्याच्या हातातील बांगड्या २० ग्रॅम किंमती २०,०००/- रु. ३) सोन्याचा गोप ८ ग्रॅम किंमती ८०००/- रु ४) कानातील सोन्याच्या विन्या २ जोड १३ ग्रॅम किंमती १६०००/- रु. ५) सोन्याचे कानातले २ जोड ६ ग्रॅम किंमती १०,०००/-रु, ६) सोन्याच्या अंगठ्या २ नग प्रत्येकी ४ ग्रॅम एकुण ८ ग्रॅम किंमती १००००/- रु, ७) एक रेडमी कंपनीचा मोबाईल ज्यात जिओ कंपनीचे सिम असलेला किंमती ३०००/-रू. असा एकुण ८७,०००/- रुपयाचा मुद्देमाल चोरी करुन नेला आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. कळमेश्वर येथे अज्ञात आरोपीविरुध्द कलम ४५७, ३८० भादंवि, कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर अज्ञात आरोपीचा शोध सुरू असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार गंगाधर ठाकरे हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भरदिवसा कार चे काच फोडुन १ लाख २२ हजार रू. चा मुद्देमाल चोरुन चोरटे पसार

Fri Dec 15 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कन्हान :- कांद्री परिसरातील वाईन शाॅप बियर बार जवळ महामार्गावर उभ्या असलेल्या कारचे भरदिवसा कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कारचे काच फोडुन सिट वरील दोन ब्यॅग चोरून १ लाख २२ हजार रूपयाचा मुद्देमाल चोरुन पसार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात चांगलीच खळखळ उडाली आहे. प्राप्त माहिती नुसार गुरवार (दि.१३) डिसेंबर ला सकाळी ११ वाजता दरम्यान तनुश चंद्रशेखर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com