नागपूर :-फिर्यादी सूमूख नितेश मिश्रा, वय ४६ वर्षे, रा. प्लॉट नं. २७, अमृत स्मृती बंगलो, बलराज मार्ग, तोली, नागपूर यांचे पोलीस ठाणे प्रतापनगर हद्दीत, प्लॉट नं. ५, जलविहार कॉलोनी, हिंगणा टि-पॉईन्ट, रिंग रोड येथे ‘शतायू कॉलेज ऑफ प्रोफेशनल स्टडीज’ नावाचे युजी कॉलेज आहे. नमुद कॉलेज मध्ये आरोपी नामे गुलशन वर्मा, वय २१ वर्षे, रा. फ्लॅट नं. २०२, दुसरा माळा, गुरूदत्त हाऊसिंग सोसायटी, नरेन्द्र नगर, नागपूर हा अकाऊंटंट व कॅशीअर चे काम मागील ८ वर्षांपासून करीत होता. दिनांक १०.०१.२०२३ चे १०.०० वा. ते दिनांक ०९.०३.२०२४ चे १२,०० वा. चे दरम्यान, आरोपीने कॉलेजच्या नावाने खोटे युपीआय आयडी बनवुन, विद्याथ्यांचे अॅडमीशन करीता खोटी पावती पुरवुन, आपले स्वतःचे फोन पे अॅकाऊंट वर १२,९८,५००/- रू. वळते करून, फिर्यादी, विद्यार्थी व कॉलेजची आर्थिक फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे प्रतापनगर येथे पोउपनि, दंधाले यांनी आरोपीविरूद्ध कलम ४०८, ४२०, ४६५, भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंदवुन, आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.