भिवापूर :- अंतर्गत ०१ किमी अंतरावर एच डी एफ सी एटीएम भिवापुर येथे दिनांक ०१/०८/२०२३ चे सकाळी ०८.०० वा. दरम्यान यातील अज्ञात आरोपीने हातचालाखीने स्वतः जवळील एटीएम हे फिर्यादी नामे- प्रेमदास देवादास दुपारे, वय ४२ वर्ष, रा. आझाद चौक वार्ड नं १३ भिवापुर ता. भिवापुर जि. नागपुर याचे एटीएम सोबत बदली करून त्यांचेंडुन त्यांचे एटीएम प्राप्त करून एटीएम स्क्रिनवरील फिर्यादीचे नाव मिटवुन देतो असे म्हणून दोन तिन वेळा पिन नंबर टाकण्यास सांगितले व फिर्यादीचे एटीएम घेवुन निघुन गेला त्यानंतर सदर एटीएमचा वापर करून अज्ञात आरोपीने वेगवेगळया ठिकाणावरून फिर्यादीचे बँक खात्यामधील ३२,८९३ /- रू काढून विश्वासघात व फसवणुक केली. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पो.स्टे. भिवापूर येथे आरोपीविरुध्द कलम ४०६, ४२० भादवि. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सडमेक हे करीत आहे.