संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- अंगणवाडी श्रेणीवर्धन योजने अंतर्गत साहित्य पुरवठा करण्यासाठी कामठी तालुक्यातील अंगणवाड्याना प्राप्त निधीतून कामठी तालुक्यातील चार अंगणवाडी केंद्रात 8 लक्ष रूपयाचा साहित्य घोटाळा झाला असून यासंदर्भात कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले यांनी कामठी पंचायत समितीचे सिडीपीओ विरुद्ध नविन कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली त्यानुसार नवीन कामठी पोलिसांनी केलेल्या चौकशीत कामठी पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजना कार्यालय कामठी चे प्रकल्प अधिकारी आर के चव्हाण यांनी 31 मार्च 2024 ते 1 जून 2024 दरम्यान संगनमत करून अंगणवाडी श्रेणी वर्धन साहित्य प्रकरणात 8लक्ष रूपयाचा अपहार करून फौजदारी पात्र न्यासभंग केला.त्यावरून कामठी पंचायत समिती चे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधीकारी आर के चव्हाण, संजीवनी उद्योग नागपूर चे मालक विरुद्ध भादवी कलम 420,409,34 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंगणवाडी श्रेणीवर्धन योजने अंतर्गत अंगणवाडयाना साहित्याचा पुरवठा करण्यासाठी मार्च 2024 मध्ये कामठी तालुक्यातील येरखेडा, गादा,भुगाव , व पोवारी या चार गावातील अंगणवाडी केंद्रात प्रत्येकी 2 लक्ष रुपये प्रमाणे 8 लक्ष रूपयाचा साहित्य पुरवठा करण्यात आला मात्र हे साहित्य पुरवठा बाजार भाव मूल्यपेक्षा अधिक किमतीने खरेदी विक्री केली असून या व्यवहारात आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप करीत बीडीओ प्रदीप गायगोले ने तत्कालीन सेवानिवृत्त सिडीपीओ रवींद्र चव्हाण विरुद्ध कामठी पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदविली होती त्यानुसार आज दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास सुरू आहे.