– पोलीस स्टेशन भिवापूरची कारवाई
भिवापूर :- पोलीस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ भिवापूर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पोस्टे परीसरात हायवे रोड़ने पेट्रोलिंग करीत असतांना मौजा पांजरेपार गावाजवळ भिवापुर ते उमरेड जाणारे हायवे रोड वर अंदाजे २२/३० वा. दरम्यान १० चक्का टिप्पर क्र. एम. एच. ४० बी.एल ७३४५ हा संशयीतरित्या जाताना दिसल्याने सदर टिप्पर चालकास थांबण्याचा इशारा केला असता चालकाने टिप्पर रोडचे कडेला थांबविल्याने टिप्परची पाहणी केली असता टिप्पर मध्ये अंदाजे ०५ ग्रास रेती आढळून आल्याने टिपर चालकास रेती बाबत परवाना (रॉयल्ट्री) विचारपुस केली असता परवाना नसल्याचे सांगितल्याने तसेच टिप्पर चालकास नाव पत्ता विचारला असता त्याने आपले नाव उमेश सुरेश ढोक, वय ३० वर्ष रा. चिमनाझरी पोस्ट मटकाझरी ता. उमरेड जि. नागपुर असे सांगितले. तसेच सदर रेती ही मालक नामे सबिन सुर्यभान फटींग, वय ४० वर्ष, रा. चिमनाझरी ता. उमरेड यांचे सांगणेवरुन टिप्पर मध्ये रेती भरुन आणली असे सांगितले, सदर टिप्पर क्र. एम.एच.-४०/ वी.एल. ७३४५ किंमती २०,०००००/- रुपये मध्ये अंदाजे ५ ब्रास रेती प्रत्येकी ५०००/- रुपये प्रमाणे एकूण किंमती २५०००/- रुपये असा एकुण २०,२५०००/- रुपयाचा मुद्देमाल टिप्पर मध्ये अवैद्यरित्या विनापरवाना रेतीची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने सदर टिप्पर चालक यांचे ताब्यातुन जप्त करण्यात आला आहे. आरोपी टिप्पर चालक नामे उमेश सुरेश ढोक वय ३० वर्ष रा. रा. चिमनाझरी पोस्ट मटकाझरी ता. उमरेड जि. नागपुर व मालक नामे सचिन सुर्यभान फटींग, वय ४० वर्ष, रा. चिमनाझरी ता. उमरेड यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन भिवापूर येथे क्लम ३७९, १०९ भादेवी सहकलम ४८(८) महाराष्ट्र जमिन महसुल अधि. १९६६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. आरोपी टिप्पर चालक याला अटक करण्यात आली असुन टिप्पर मालक याचा शोध घेणे सुरू आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर (ग्रामीण) हर्ष पोहार (भा.पो.से.) तसेच अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात मा. उपविभागीय पोलीस अधिकारी उमरेड विभाग राजा पवार, पोलीस स्टेशन भिवापूर येथील ठाणेदार प्रमोद पांबराव चौधरी, पोलीस उपनिरीक्षक संदीप सडमेक, पोलीस अंमलदार रवि वानखेडे, चालक पोलीस अंमलदार अविनाश सोरदे पोस्टे भिवापुर यांनी पार पाडली.