नागपूर :-पोलीस ठाणे गिट्टीखदान हद्दीत प्लॉट नं. १२७, आदिवासी सोसायटी, वृंदावन कॉलोनी, नागपुर येथे राहणारे फिर्यादी नामे पंकज विनायक पडोळे, वय ४३ वर्षे, यांनी त्यांचे गराचे अंगणात त्यांचे स्वतःचे दोन मोडे दोरीने बांधुन ठेवले होते. कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे दोन घोड्यांपैकी एक पांढऱ्या रंगाचा, नुखऱ्या जातीया घोडा किंमती अंदाजे २,००,०००/-रु. या चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे गिट्टीखदान येथे मसपोनि भोपाळे ८६९१०४०४८३ यांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३७९ भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करून, आरोपीचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.
चोरी करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com