– नागपूर ग्रामीण पोलीसांची कारवाई
मौदा :- दिनांक २८/०३/२०२४चे ०७.३० वा. दरम्यान पोलीस स्टेशन मौदा येथील स्टाफ पोस्टे मौदा हद्दीत अवैध रेती वाहतूकीस आळा घालणेकरीता पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गोपनीय सुत्रानुसार मौजा मारोडी येथे आरोपी नामे-गजानन आत्माराम कडव, रा. चिरवा ता. मौदा हा आपल्या ताब्यातील विना क्रमांकचा ट्रॅक्टर व विना क्रमांकाची ट्रॉली मध्ये अंदाजे ०१ ब्रास रेती अवैधरीत्या व विनापरवाना भरून चोरटी वाहतूक करतांना मिळुन आल्याने रेतीचे रॉयल्टीबाबत विचारले असता त्याने रॉयल्टी नसल्याचे सांगितल्याने व सदरची रेती चोरीची असल्याची खात्री झाल्याने आरोपीचे ताब्यातून लाल रंगाचा विनाक्रमांकचा ट्रॅक्टर किंमती ४००,०००/- रू. व त्यामधील ०१ ब्रास रेती किंमती ४०००/-रू. असा एकुण ४,०४,०००/-रु. चा मुद्देमाल जप्त करून ट्रॅक्टर चालक/मालक नामे- गजानन आत्माराम कडव, रा. चिरवा, ता. मौदा वय ४२ वर्ष, रा. चिरवा ता. मौदा याचेविरूद्ध कलम ३७९, १०९, ३४ भादवि. सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमिन महसूल संहिता, सहकलम २१, ०४ खाणी आणि खनिजे अधिनियम १९५७ सहकलम ३ सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक अधि. १९८४ अन्वये पो. स्टे. मौदा येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कार्यवाही हर्ष ए पोद्दार पोलीस अधीक्षक नागपुर जिल्हा ग्रामीण, रमेश धुमाळ अपर पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी कन्हान विभाग कन्हान यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे मौदा येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक सतिशसिंग राजपूत, पोहवा अनिल कोकोडे, नागेश वाघाडे, पोलीस अंमलदार सचिन हटवार यांनी पार पाडली.