नागपूर :- पोस्टे एमआयडीसी बोरी येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलींग करीत असता गोपनीय माहिती मिळाली की, केदार कॉलनी वार्ड क्र. ०२ एमआयडीसी बोरी येथे आरोपी राकेश शांतारामजी वारे, वय २९ वर्ष, रा. केदार कॉलनी वार्ड क्र. ०२ एमआयडीसी बोरी हा आपल्या घरात अवैद्यरीत्या विनापरवाना दारू बाळगुन विक्री करीत आहे. अशा माहिती वरून रेड कारवाई करून दारूबाबत आरोपीच्या घराची घरझडती घेतली असता घराच्या आतील खोलीत एका बोरीमध्ये १९२ निपा देशि दारू भिंगरी १८० मिली प्रत्येकी किंमती ७० रू. प्रमाणे एकुण १३४४०/- रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरूद्ध पोस्टे एमआयडीसी बोरी येथे कलम ६५ ई मदाका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे एमआयडीसी बोरी येथील ठाणेदार पोनि सतिशसिंग राजपूत, पोउपनि सुशिल सरकार, पोलीस अंमलदार दिलीप नवले, उज्वल कोठे, प्रतीक पारटवार, महिला पोलीस अंमलदार योगिता तुमसरे यांनी पार पाडली.