संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- वेकोलि कामठी कॉलरी खदान नं.३ येथे आई वडिलासह राहणा-या २३ वर्षीय मुलगी मेडप्लस फार्मसी कन्हान ला फार्मेसिस्ट चे काम करित असताना तिच्याच कॉटर च्या वर राहणारा भीम चौव्हाण यांने तिला नेहमी त्रास देत फार्मसीत जाऊन तिला जाती वाचक शिविगाळ व परिवाराला जिवे मारण्याची धमकी देऊन तिला झापड व भुक्की मारून जबरदस्तीने पकडुन तिचे चुंबन घेऊन तेथुन निघुन जात परत दुस-या दिवसी तिचा पाठलाग करित असल्याने मुलीने कन्हान पोस्टे ला तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी भीम चौव्हाण विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मंगळवार (दि.३) ऑक्टोंबर ला एक २३ वर्षीय मुलगी रा. कामठी कॉलरी नं ३ ही मेडप्लस फार्मसी शहीद चौक कन्हान ला फार्मेसिस्ट चे काम करणारीचे वडिल वेकोलि कोळसा खदान मध्ये नौकरी असल्याने खदानच्या कॉटर मध्ये राहते. त्यांच्या घराच्या वरच्या माळयावर भिम रामसुरत चौव्हाण परिवारासह राहत असुन सन २०१९ ला त्याने मुलीला मँसेज केला होता. तेव्हा पासुन त्यास ओळखत असुन त्याला माहित आहे कि ती चांभार जातीचे आहे. तेव्हा पासुन तो तिला कॉल लावण्याचा प्रयत्न करित असल्याने तिने त्याचा नंबर ब्लॉक केला. तरी तो येता जाता घुरत होता आणि कुठल्या न कुठल्या प्रकारे त्रास द्यायचा. २०२३ मध्ये भीम चौव्हाण चे लग्न झाले तरी सुधा तो येता जाता तिला पाहत राहुन टॉंट मारत होता. सोमवार (दि.२) ऑक्टोंबर ला दुपारी १ वाजता मेडप्लस फार्मसी शहीद चौक कन्हान येथे काम करित असताना भिम आला व तिला शिविगाळ करित म्हणाला की, मी तुझ्या करिता पत्नीला घराबाहेर काढले, तु माझ्याशी लग्न कर नाही तर तुला जिवानिशी मारून टाकेल, व तुझा चेहरा जाळुन टाकेल. आणि तुला दुस-या सोबत लग्न सुध्दा करू देणार नाही. यावर तिने काहीही उत्तर न दिल्याने त्याने तिला झापड मारली, फोन करण्यास उचलला असता त्याने फोन हिसावुन तिला भुक्कीने गालावर, डोक्यावर मारले व म्हणाला की, मी राजपुत आहे आणि तु जातीने चांभारीन तरी सुध्दा मी प्रेम करतो. असे जाती ला संबोधुन शिविगाळ करून मला पकडुन धमकावुन माझ्या घरच्याना जिवे मारण्याची धमकी देऊ लागला. त्यानंतर जबरदस्तीने पकडुन तिचे ओठाचे चुंबन घेऊन तेथुन निघुन गेला. तो जो पर्यंत होता तोपर्यंत फार्मसीत १५ ते २० ग्राहक आले परंतु त्याने काम्पुटर बंद असल्याने बिल निघत नाही म्हणुन त्याना परत केले. सायंकाळी ७ वाजता ती भावा सोबत घरी गेले. भिती पोटी कुणाला काहिही सांगितले नाही. दुस-या दिवसी (दि.३) ऑक्टोंबर ला सकाळी १० वाजता भावा सोबत मेडप्लस फार्मसी शहीद चौक कन्हान ला जात असता परत तो पाठलाग करू लागला. म्हणुन वाटले की तो फार्मसी मध्ये येऊन त्रास देईल. त्यामुळे तीने भावाला व वडिलाना घडले ला प्रकार सागुन कन्हान पोस्टे भीम चौव्हाण विरूध्द तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीस निरिक्षक सार्थक नेहते हयानी आरोपी भीम रामसुरत चौव्हाण वय २६ वर्ष रा. कामठी कॉलरी नं ३ कॉटर न १२६ यांचे विरूध्द अप.क्र. ६४२/२ड२३ कलम ३५४ (अ), ३५४ (ड), ३२३, ५०४, ५०६ भादंवि आर/डब्लु कलम ३ (१) (डब्लु) (i) (ii) ३ (२) (वी ए), ३(१) (५) (५) अनु जाती / जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.