खुन करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

जलालखेडा :- अंतर्गत परसोडी दिक्षीत ८ किमी उत्तर यातील मृतक हा दि. २५/०८/२३ चे सकाळी ०७.०० वा पासुन घराबाहेर गेला होता, तो दि. २६/०८/२३ चे सकाळी ६.३० वा दरम्यान, यातील फिर्यादी हा भारसिंगी वरून परत परसोडी येथे आले असता, तेव्हा गावातील देवीदास सोनवाने यांनी फिर्यादिला सांगीतले की, तो सकाळी गावाला लागून असलेल्या पादन सत्याने जात असता, उमेश खंडार हा उबड्या स्थीतीत झोपला दिसला असे सांगीतल्यावरुन फिर्यादिने लगेच उमेश खंडार यांच्या पत्नी सुनिता खंडार हिला सोबत घेवुन तसेच गावातील लोक मिळुन घटनास्थळी जावुन मृतक ला बघीतले असता तो दगडावर उबड्या स्थीतीत दिसला, तेव्हा मृतकच्या पत्नी सुनिता खंडार हिने मृतकला दगडावरून बाजुला केले असता तो मरण पावलेला दिसला मृतकाच्या शरीरावर डोक्याला व इतर भागाला जखम झालेली दिसली. कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन मृतकास दगडाने मारुन तसेच शरीरावर हातपायावर मारून जिवानीशी ठार मारले आहे.

सदर प्रकरणी फिर्यादी नामे निखील दिलीपराव महे वय ३३ वर्ष रा. परसोडी दिक्षीत ता. नरखेड यांचे रिपोर्टवरून पो.स्टे. जलालखेडा येथे अज्ञात आरोपीविरूध्द कलम ३०२ भादवी अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि मनोज चौधरी हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चंद्रपूर येथे जिल्हा स्तरीय टग ऑफ वार ( रस्सीखेच ) निवड चाचणी सम्पन्न - 2023

Mon Aug 28 , 2023
चंद्रपूर :- टग ऑफ वार असोसिएशन चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने चंद्रपूर येथे जिल्हा स्तरीय सब ज्युनियर, ज्युनियर, ज्युनियर मिक्स, सिनियर व सिनियर मिक्स ( मुले व मुली ) टग ऑफ वार निवड चाचणी दिनांक २७ ऑगस्ट २०२३ रोजी ठीक सकाळी ११:०० वाजता सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूरच्या मैदानावर घेण्यात आली होती. या निवड चाचणीच्या उदघाटन प्रसंगी उद्घाटक म्हणुन प्रा. डॉ. विजय सोमकुंवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com