नागपूर :- फिर्यादी क्षितीज विकास गुप्ता, वय २३ वर्ष रा. प्लॉट न. २८ फ्रेन्ड्स कॉलोनी काटोल रोड, नागपूर यांना त्यांचे इंस्टाग्राम आयडीवर BIANCA ODELL या आयडी धारक नावाने आरोपि मॅसेज करून बिटकॉईनमध्ये इन्वेस्ट केल्यास माईनिंग प्रॉफीट बैंक अकाउंट मध्ये ट्रॉन्सफर केला जाईल असे सांगुन एक ॲप पाठविले. फिर्यादीने ॲप डाऊनलोड करून डिटेल्स भरले आरोपींनी फिर्यादीस वेळोवेळी नफ्याचे आमीष दाखवून वेगवेगळया अकाउंट मध्ये वेगवेगळया रकमा भरण्यास सांगीतल्या फिर्यादीने एकूण १३,१७,०००/- रू वेळोवेळी गुंतवणुक करिता ऑनलाईन भरले. फिर्यादीने रक्कम परत मागीतली असता ते पैसे परत करण्याकरीता पुन्हा पैसे भरावे लागतील असे सांगुन फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे सायबर येथे सपोनि बागुल यांनी आरोपीविरुद्ध कलम ४२०, भादवि सहकलम ६६ (ड) आयटी ॲक्ट अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेत आहे.पुढील तपास सुरू आहे.
फसवणुक करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com