नागपूर :-पोलीस ठाणे हिंगणा हद्दीत,प्लॉट नं. १६५, महाजन वाडी, हिंगणा, नागपुर येथे राहणाऱ्या फिर्यादी नलीनी पुरूषोत्तम तांबुलकर वय ५२ वर्षे यांना आरोपी नामे प्रदीप किसन खंगार वय ५५ वर्ष व त्याची पत्नी वंदना प्रदीप खंगार वय ४८ वर्ष दोन्ही रा. रायपूर, हिंगणा, जि. नागपूर यांनी संगणमत करून ते दोघे पोस्टाचे एजंट असल्याचे फिर्यादीस भासवुन फिर्यादी व ईतर ठेवीदार यांचे कडुन एफ. डी तसेच आर.डी स्वरूपात वेळी वेळी ठेवी स्वीकारून नमुद रक्कम त्यांचे पोस्टाचे खात्यात जमा न करता नमुद रकमेचा स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता वापर करून फिर्यादी तसेच ईतर ठेवीदार यांची एकुण २,२५,५८,४००/- रू अन्यायाने विश्वासघात करून फसवणुक केली.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून तसेच अर्जाचे चौकशीवरून पोलीस ठाणे हिंगणा येथे सपोनि. वाघ यांनी दोन्ही आरोपीविरुध्द कलम ४०६, ४०९, ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७९, ३४ भा.द. वी. सहकलम ३ महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संबंधाचे संरक्षण अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.