खोटे कागदपत्र तयार करून कार विक्री प्रकारणात फसवणूक करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना रोड वरील फिटनेस जिम मध्ये झालेल्या कार खरेदी करण्याचा शाब्दिक व्यवहारातून आरोपीने खोटे कागदपत्र तयार करून कार विक्री चा 2 लक्ष 60 हजार रुपयात सौदा करून फिर्यादीने आरोपीस 1 लक्ष 75 हजार रुपये नगदी दिले मात्र ही कार नागपूर च्या बांगलादेश येथील मनिष भैसारे कडे 90 हजार रुपयात गहान असल्याचे माहिती मिळाली .यावरून आरोपीने कार चे खोटे कागदपत्र तयार करून 1 लक्ष 75 हजार रुपयाची फसवणूक केल्याची घटना 7 डिसेंबर 2022 ला घडली असून यासंदर्भात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यासाठी न् फिर्यादी संतकुमार मुंनूलाल अजित वय 37 वर्षं रा न्यू येरखेडा ने न्यायालयात दाद मागितले असता न्यायालयीन आदेशानुसार 24 मार्च ला आरोपी अनुज साहेब सिंग रा कन्हान विरुद्ध भादवी कलम 420,406,467, 468,471,120 (ब)अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संतकुमार अजित रा येरखेडा यांना आपले हॉटेलचे कामकाजाकरीता चार चाकी वाहनाची आवश्यकता असल्याने त्याचे ओळखीचे आरोपी अनुज सींग हे सेकण्ड हॅण्ड चार चाकी वाहनाची ब्रिकी व खरेदीचा व्यवसाय करीत असल्याने त्यानी सेंकण्ड हॅण्ड चार चाकी वाहनाबाबत सांगीतले. व त्यासाठी आरोपीने सेकण्ड हॅण्ड एक कंपनी – मारूती आल्टो वाहन क्र. एम.एच.४९.बी. आर. ४५१५ कलर – ग्रेनाईट ग्रे चेचीस नंबर एफ.८डी.एन. ६६१०२२७ इंजिन नंबर एम.ए ३ ई.यु.ए.६१एस. ००जे. ६८१९९ची चार चाकी वाहन दाखवीले व त्याची कीमंत २,६०,०००/ सांगीतले. त्यानतर गाडीचा सौदा १,७५,००० मध्ये झाला. फिर्यादीने १,७५,००० रूपये नगदी दिले. त्यावर आरोपीने गाडीची ओरीजनल आर सी, गाडी मालकाचे सही असलेले फॉर्म न.२८,२९,३०, आणी १०० रूपयाचा स्टॅम्प पेपर व गाडी ताब्यात दिले. काही दिवासानी गाडी घेवुन कळमना येथे गेले असता कमलेश गुप्ता यानी सांगीतले की ही गाडी माझे मालकीची आहे. ही गाडी त्याने मनिश भैसारे रा. नाईक तलाव बाग्लादेश यांचेकडे ९०,००० रूपयात गहाण ठेवली आहे. व त्याला ओरीजनल आरकृसी दिली होती. मी त्याला आर.सी. आणी फॉर्म न. २८,२९,३०, आणी १०० रूपयाचा स्टॅम्प पेपर दाखवीले. परंतु त्याने सांगीतले ही सही माझी नाही मी केलेली नाही. त्यावरून फीर्यादीचे लक्षात आले आरोपी अनुज साहेब सिंग याने खोटे कागदपत्रे तयार करून संगमत करून फिर्यादी ची फसवणुक केली आहे. अशा फिर्यादी यांनी मा. न्यायालयात दाद मागीतली व मा. न्यालयाचे जावक कं. ५४/२४ दि. २१/०३/२०२४ चे सीआरपीसी कलम १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राप्त झाले वरून वर नमुद कलमान्वये सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धुलिवंदनाच्या दिवशी काल नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांनी कामठी येथे भेट देऊन पोलीस वसाहत ,पोलीस लाईन, जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीसह पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यासह लहान बालकांना मिष्ठांन वितरण करून होळीचा रंग उधळा मात्र जरा जपूनच...असा संदेश दिला

Tue Mar 26 , 2024
कामठी :- धुलिवंदनाच्या दिवशी काल नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंघल यांनी कामठी येथे भेट देऊन पोलीस वसाहत ,पोलीस लाईन, जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीसह पोलीस स्टेशन च्या कर्मचाऱ्यासह लहान बालकांना मिष्ठांन वितरण करून होळीचा रंग उधळा मात्र जरा जपूनच…असा संदेश दिला. Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com