प्राणांतीक अपघात करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर :- पोलीस ठाणे मानकापुर ह‌द्दीत प्लॉट नं. ३२, गोरेवाडा रोड, भाटी अपार्टमेंट नं. १. मानकापूर येथे राहणारे योगेश हेमंत बन्सोड हे त्यांची दुचाकी क. एम. एच. ४९ वि. ई. ८७६२ ने पोलीस ठाणे यशोधरानगर ह‌द्दीत प्रधानमंत्री आवास कॉम्प्लेक्स समोरील विटाभट्‌टा चौक कडुन ऑटोमोटीव्ह चौक कडे जाणारे रोडवर नंदी चौक येथून जात असता, त्यांनी त्याचे ताब्यातील दुचाकी भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन रोड कॉस करणारे हातठेल्याला धडक दिली. धडकेत दुचाकीस्वार हे खाली पडल्याने त्यांचे डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. जखमी यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.

याप्रकरणी पोलीस ठाणे यशोधरानगर येथे मसपोनि, गोखरे  यांनी दुचाकी चालका विरूध्द कलम १०६(१) भा.न्या. संहीता अन्वये गुन्हा दाखल करून, पुढील तपास करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी वडीलास अटक

Wed Jul 10 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे अजनी हद्दीत प्लॉट नं. १६, ओम साई नगर, मानेवाडा बेसा येथे राहणाऱ्या फिर्यादी यांचे सासरे माणिकराव पुंडलीक इंगळे वय ६९ वर्ष हे सि.आर.पी.एफ मधुन निवृत्त असुन त्यांचे कडे परवाना असलेली १२ एम. एम बोअर रायफल आहे, व ते सिस्को कंपनीमध्ये ए.टी.एम कॅश गाडीवर सुरक्षा रक्षकचे काम करतात. फिर्यादीचे पती नितीन माणिकराव इंगळे वय ४० वर्ष हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com