संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– पाच हजार नऊशे चा गांजा जप्त, कन्हान पोलीसांची कारवाई
कन्हान :- पोलीसानी गुप्त माहितीवरून शिव नगर कांद्री येथे धाड मारून स्वत:च्या घरी अंमलीपदार्थ गांजा विक्री करणारा चंदारी सहानी यास पकडुन त्यांचे ताब्यातुन ५९२ ग्राम गांजा किमत पाच हजार नऊ शे रूपयाचा मुद्देमाल जप्त करून त्यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली.
गुरूवार (दि.०३) एप्रिल २०२५ ला सायंकाळी कन्हान पोलीसांना गुप्त बातमीदाराने खात्रीशीर माहीती दिली की, चंदारी निनकु सहानी रा. शिवनगर कांद्री हा त्याचे राहते घरामध्ये अंमली पदार्थ गांजा बाळगुन गांजाची विक्री करतो. प्राप्त माहीतीच्या आधारे पोलीसांनी घटनास्थळी जावुन सापळा रचुन आरोपी चंदारी निनकु सहानी, वय ५४ वर्ष, रा. शिव नगर कांद्री, ता. पारशिवनी, जि नागपुर याला ताब्यात घेऊन आरोपीचे ताब्यातुन ५९२ ग्राम अंमलीपदार्थ गांजा किंमत ५९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याने कन्हान पोस्टे ला आरोपी चंदारी निनकु सहानी, वय ५४ वर्ष, रा. शिव नगर कांद्री, ता. पारशिवनी, जि नागपुर याचे विरूध्द एन. डी. पी. एस. कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.
सदर कारवाई ही उपविभागिय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड, कन्हान पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात सपोनि राहुल चव्हाण, हे कॉ हरिश सोनभद्रे, नापोशि अमोल नागरे, अनिल याद व, पोशि अश्विन गजभिये, आकाश सिरसाट, जिवन विघे, हर्ष यादव, राहुल जाधव हयानी शिताफितीने यशस्वितेरित्या पार पाडली.