खापा :- दिनांक ०५/०१/२०२४ रोजी खापा पोलीस स्टेशन हद्दीतील खूबाळा रोडवर एक पिकअप वाहन क्रमांक एम एच ३१/एफ सी ७१७३ मध्ये वाहन चालक हा जनावरे कोंबून नेत असल्याबाबतची माहिती मिळाल्याने, पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफ सरकारी वाहनाने मिळालेल्या खबरेवरून मौजा खुवाव्य येथील मानकसिंग देवरोड चांभार नाला येथे जावुन सदर वाहनाची पाहणी केली असता गाडीमध्ये जनावरे असलेली गाडी असुन व त्या गाडीची पाहणी केली असता त्या गाडीचा चालक नव्हता. सदर ठिकाणी खापा पोलीस पोहोचण्यापूर्वी वाहन चालक हा वाहन जंगल परिसरामध्ये थांबवून, पळून गेला सदर वाहनांमध्ये एकूण ०७ (०५ गायी) व (दोन गोरे) काळया पांढऱ्या रंगाचे गोवंश कोंबून निर्दयतेने भरून जखमी अवस्थेत मिळून आले, सदर ईन्टंरा पिकअप वाहन क्र. एम. एच. ३१ एफ. सी. ७१७३ ये चालकाने ०५ गायी व ०२ गोरे गोवंश कत्तलीसाठी आखुड दोराने त्याचे पायांना बांधुन अत्यंत कुरतेने व निर्दयतेने डाल्यात कोंबुन महाराष्ट्र राज्यात गोवंश जनावरांची कत्तली व वाहतुकी करीता मनाई असतांना सुध्दा वाहतुक करुन वाहन घटनास्थळावर सोडुन चालक पळुन गेला. घटनास्थळाहुन व ईन्टरा पिकअप वाहन क्र. एम. एच. ३१ एफ.सी. ७९७३ अंदाजे किंमती ३,००,०००/- रु. ०५ गायी व ०२ गोरे काळया पांढऱ्या रंगाचे किंमती प्रत्येकी ५०००/-रू, असा एकुण ३५०००/-रू. असा एकुण किंमती ३,३५,०००/- रु. या मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन ०५ गायी व २ गोरे यांना श्रीकृष्ण भगवान गौशाळेमध्ये नरखेड वेलोना येथे दाखल केले. ईन्टंरा पिकअप वाहन क्र. एम. एच. ३१ एफ. सी. ७९७३ चे चालकाविरूद्ध कलम ११(१), (ड) महाराष्ट्र प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम १९६० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com