पोस्टे पारशिवनी :- अंतर्गत ०५ किमी अंतरावर मौजा पालोरा शिवार येथे दिनांक ३०/०५/२०२३ चे ०६/३० वा. ते ०७/१५ वा. दरम्यान पोलीस स्टेशन पारशिवनी येथील स्टाफ पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, पोलिस ठाणे पारशिवनी हद्दीतील मौजा पालोरा शिवार येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीचा साठा साठवुन ठेवला आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून नमुद घटनास्थळी गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने इरफान पठाण यांचे वडीलोपार्जित असलेल्या पडीत जमीनीवर झाडाझुडपांमध्ये अंदाजे १० ब्रास अवैध रेतीचा साठा अंदाजे किंमती ५०,०००/- व तेथुन पुढे गेल्यानंतर पेंच नदीचे पात्राला लागून असलेल्या नागोराव काळे रा. नागपूर यांचे शेतामध्ये अंदाजे ३५ ब्रास अवैध रेतीचा साठा अंदाजे किंमती १,७५,०००/- रु. असा एकूण ४५ ब्रास रेती एकूण किमती अंदाजे २,२५,०००/- रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या रेतीचा साठा मिळून आला. सदर प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी नामे नापोशि राहुल तभाने ब नं. २९०५ पो.स्टे. पारशिवनी यांचे रोपोर्ट वरून सदर प्रकरणी पो.स्टे. पारशिवनी येथे आरोपीविरूद्ध कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद केला असून गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे हे करीत आहे.
अवैध रेतीचा साठा करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com