नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत पर्ल हेरीटेज सोसायटीचे बाजुला, कान्हा सेलीब्रेशन जवळील मोकळया पॉट वरून फिर्यादीचे वडील कन्हैयालाल रामचंद्र मटाले वय ६७ वर्ष रा. हेरीटेज सोसायटी टाउन क. ए १५९. कान्हा सेलीब्रेशन जवळ, उमरेड रोड, नागपूर हे पायदळ जात असता तेथे अनाधिकृतरित्या टाकलेल्या ईलेक्ट्रीक वायरचा करंट लागल्याने मरण पावले होते.
मृतक यांचे मृत्यूस आरोपी २) महा ईलेक्ट्रीसिटी बोर्ड तर्फे कार्यकारी अभियंता, शाखा साईबाबानगर, खरबी २) सार्वजनिक बांधकाम विभाग तर्फे वरीष्ठ अभियंता सिव्हील लाईन, नागपूर ३) सारस्वत इछाक तर्फे पाटनर रविद्र गुलाबराव कोठे व ईतर भागीदार ४) करण वैरागडे (पानठेला) रा. दिघोरी, नागपूर यांचेतील आरोपी क्र. ३ व ४ यांनी अनाधिकृतरित्या टाकलेल्या ईलेक्ट्रीक वायरचा करंट मृतक यांना लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच आरोपी क. १ यांचा निष्काळजीपणा मुळे तसेच आरोपी क. २,३ यांचे जागेतुन विद्युत कनेक्शन टाकुन घेतल्याने वरील आरोपी हे मृतकाचे मृत्यूस कारणीभूत झाल्याचे फिर्यादी जितेन्द्र कन्हैयालाल मटाले वय ३८ वर्ष यांनी दिलेल्या रिपोर्टवरून व अर्जाचे चौकशीवरून पोउपनि वाकदर यांनी पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे आरोपीविरुद्ध कलम ३०४(अ), ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहे.