सावनेर :- पो.स्टे. सावनेर हद्दीत यातील फिर्यादीची अल्पवयीन मुलगी वय १६ वर्ष ही दिनांक ०८/१०/२०२३ रोजी सकाळी ७/०० वा. दरम्यान मोहपा येथे क्लास असल्याचे सांगून गेली होती व दुपारी क्लास मधून ११ / ३० वा. घरी येवून घरातुन बॅगमध्ये तीने कपडे भरून फिर्यादी कामावर गेले असता कोणालाही न सांगता निघून गेलेली आहे. तिच्या कडे तिचा मोबाईल आहे. फिर्यादीने तिच्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता तिचा फोन स्विच ऑफ दिसला. तिचा शोध गावातील ईकडेतिकडे, नातेवाईकांकडे फोन करून विचारले असता आमच्याकडे आली नाही असे सांगितले त्यामुळे फीर्यादी मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम ३६३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र यादव पोस्टे सावनेर हे करीत आहे.