संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- शहरात वारंवार दिवस रात्र विधृत पुरवठा खंडीत होत असल्याने पटेल नगर येथील एका संतप्त नागरिकांनी कन्हान विधृत वितरण केंद्र अभियंतास मारहाण केल्या प्रकरणी कन्हान पोस्टे ला आरोपी शारूख खान यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.
गुरूवार (दि.३०) मे ला रात्री कन्हान शहरचा विद्युत पुरवठा खंडीत झालेला होता. दरम्यान विद्युत पुरवठा खंडित का झाला याची पाहणी कन्हान शहर वितरण केंद्र अभियंता प्रल्हाद ओमकार आणि शाखेतील कर्मचारी मामुलकर व नागमोते यांचे सह तारसा रोड वरील गोविंद जुनघरे यांचे आटा चक्री समोर बिघाड झालेल्या रोहीत्राची पाहणी करिता होते. तेव्हा शारुख फिरोज खान रा. पटेल नगर पिपरी कन्हान यांच्या परिसरातील विधृत पुरवठा खंडीत झाल्याने ते कन्हान शहर वितरण केंद्र कार्यालय पांधन रोड येथे विचारण्यास गेले असताना तेथील कर्मचा-या ने त्यास अ़भियंता मौदा ला असल्याचे सांगितल्याने अंभियंता प्रल्हाद ओंमकार हे तारसा रोड जुनघरे आटा चकी येथे जमलेल्या लोकांच्या गर्दीत दिसल्याने वारंवार विद्युत पुरवठा का खंडीत होतो अशे विचारणा करून अभियंता ओमकार यांच्या गालावर थापड मारून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत तेथुन निघुन गेला. या घटनेमुळे फिऱ्यादी अ़भियंता ओंमकार हयानी कन्हान पोलीस स्टेशन ला शारुख फिरोज खान विरूध्द शासकिय विधृत अधिका-यास मारहाण करून शिवीगाळ करित जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार (दि.३१) मे ला केल्याने कन्हा न पोलीस वरिष्ठ निरिक्षक उमेश पाटील यांच्या मार्गद र्शनान पो. हवा. नरेश श्रावणकर हयानी कन्हान पोस्टे ला आरोपी शारुख फिरोज खान विरूध्द अप क्र. ३७५/२४ कलम ३५३, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.