देहव्यापार करवुन घेणाऱ्या महिला आरोपीविरूध्द गुन्हा दाखल 

– गुन्हेशाखा, सामाजिक सुरक्षा विभाग यांची कामगीरी 

नागपूर :- सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, नागपूर त्यांना पो. ठाणे हुडकेश्वर हद्दीत तिरूपती रॉवर फ्लॅट नं. ३०४ सर्वश्री नगर बेसा पॉवर हाउस रोड, नागपुर येथे नूतन उर्फ अंजली कालसर्पे नावाची महीला ही स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता मुलींना पैशाचे आमिष देवुन देहव्यापारास प्रवृत्त करून आणि देहव्यवसायासाठी मुलींना ग्राहक व जागा उपलब्ध करून देवून वेश्या व्यवसाय करवुन घेत आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून सापळा रचुन धाड टाकली असता, त्या ठिकाणी पैश्याचे मोबदल्यात स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता पिडीत मुलीकडुन देह व्यापार करवितांना आरोपी नूतन उर्फ अंजली सचिन कालसर्पे वय ३० वर्षे, रा. प्लॉट नं. ६२, नंद्रा नगर, तरोडी, खरबी, पो. ठाणे वाठोडा, नागपुर ही मिळुन आली. तिचे ताब्यातून दोन पिडीत मुलींची सुटका करण्यात आली. पिडीत मुलींना पैशाचे आमिष दाखवून देह व्यापार करण्यास आरोपी हीने प्रवृत्त केल्याने आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे हुडकेश्वर येथे कलम ४, ५, ७ पिटा अॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

वरील कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उपायुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शना खाली पो. नि.शुभांगी देशमुख, सपोनि माधुरी नेरकर, सपोनि संतोष जाधव मोहवा अनिल अंबाडे, संजय सोनवणे, रिना जाउरकर, नापोअ लक्ष्मण चौरे, संदिप चंगोले, पोअ अश्वीन मार्ग, समीर शेख मपोअ, पुनम शेंडे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

MOIL ने बिना अनुमति के काटे 50 से अधिक पेड़

Fri Jul 14 , 2023
– मनपा गार्डन विभाग सह प्रशासन ने साधी चुप्पी नागपुर :- Sadar mount road, Hotel LB के बाजू मे MOIL ने आपनी 10000/ sq ft की जगह पर के 50 से ज्यादा पेड की काटई बिना अनुमती से की है। Maharashtra security force उस जगह की सिक्योरिटी कर रही है और MSF की देख रेख मे सारे पेड़ काटे गये […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com