नागपूर :- पोलीस ठाणे वाडी हद्दीत एल आय. जी. क्वॉर्टर, न्यू महाडा कॉलोनी, दौलामेटी, नागपुर येथे राहणाऱ्या फिर्यादी सोहानी राजेश तिवारी, वय ३१ वर्षे ह्या त्यांचे पती राजेश तिवारी, वय ४० वर्षे, यांचेसोबत घरी हजर असतांना, तिन ईसम वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाचे हे फिर्यादीचे घरी आले. ते फिर्यादीच्या पतीचे परीचित होते. फिर्यादीस पतीने पाच मिनिटात येतो असे म्हणुन त्यांचे सोबत बाहेर गेले ते लवकर परत न आल्याने फिर्यादीने बाहेर येवुन पाहीले असता, अनोळखी तिन ईसम फिर्यादीचे पतीला दंड्यासारख्या कोणत्यातरी वस्तुने मारहाण करताना दिसले. फिर्यादी ह्या घाबरल्याने कोनालाही कळविले नाही. थोड्या वेळाने त्या इसमांनी फिर्यादीचे पतीस घरात आणून सोडले. आरोपीपैकी एक करण नावाच्या ईसमाने फिर्यादीचा विनयभंग केला. तसेच आरोपींनी जाताना फिर्यादीचे पतीची शाईन गाडी क. एम. एच. ३१ सि. जे. ७२२० सोबत घेवुन गेले. फिर्यादीने त्यांचे जखमी पतीला विचारले असता, त्याने काहीही सांगीतले नाही. नंतर ते झोपी गेले. सकाळी ०७.०० वा. फिर्यादी यांनी त्यांचे पतीला उठविले असता, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने, नातेवाईक व पोलीसांना कळविले व त्यांना मेडीकल येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले आरोपी यांनी कोणत्यातरी कारणावरून फिर्यादीचे पतीस मारहाण केल्याने त्यांचा मृत्यु झाला अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे वाडी येथे मसपोनि प्रियंका पाटील यांनी आरोपीताविरूध्द गुन्हा दाखल करून, आरोपींचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.