संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या यादवनगर रहिवासी इसमाच्या नावाने खोट्या प्लॉटचा विक्री करारनामा करून करारनामा बुकवर खोट्या स्वाक्षरी करून खोट्या पावत्या तयार करून फौजदारी पात्र कट रचून मानसिक प्रताडीत करण्याचा प्रकार 5 डिसेंबर 2019 रोजी घडला असता याप्रकरणात पीडित इसमास आरोपीने 76 हजार रुपयाची खंडणी मागितली यासंदर्भात फिर्यादी राजेंद्रसिंह यादव रा यादवनगर कामठीने स्थानिक पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली मात्र यासंदर्भात पोलीस कुठलीही कारवाही करीत नसल्याने पथमवर्ग न्यायालय कामठीत अर्ज सादर केले असता यावरून न्यायालयाने 156(3) सीआरपीसी कलम 120(ब),383,384,420, 468,471,473,34,506 अनव्ये आरोपी सुशील यादव रा भिलगाव कामठी तसेच कन्हान रहिवासी दोन महिला व इतर आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.