नागपूर :- पोलीस ठाणे यशोधरानगर हद्दीत विनोबाभावे नगर ते कळमणा पुलाकडे पायदळ जाणारे देवीदास गुलाबराव थेटे वय ४० वर्ष रा. कुंदनलाल गुप्ता नगर, यशोधरानगर यांना ते रोड क्रॉस करीत असता. आरोपी एका लाल रंगाचे कार चालकने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून त्यांना धडक मारून गंभीर जखमी करून पळून गेला. जख्मी यांना उपचाराकरीता मेयो हॉस्पीटल वार्ड क. ३९, येथे दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारादरम्यान दि. १५.०६. २०२३ चे ०२.१५ वा. तपासून मृत घोषीत केले.
याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून पोलीस ठाणे यशोधरानगर येथे पोउपनि पारोडे यांनी आरोपी वाहन चालकाविरूध्द कलम ३०४(अ), २७९, भा.दं.वी सहकलम १३४, १७७ मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे.