नागपूर :- दिनांक २९.०५.२०२३ चे १४.३० वा. ते १४.४५ या चे दरम्यान आकाश दुर्गाप्रसाद जांभुळकर वय २६ वर्ष रा. वार्ड क. १. परसोडी ता. लाखनी जि. भंडारा हे त्यांची होंडा शाईन मोटरसायकल वर त्यांची पत्नी नामे निर्धरा आकाश जांभुळकर वय २७ वर्ष व सासरा नामे राजाराम नानाजी दुर्गे वय ५५ वर्ष रा. सुपगाव ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर असे मोटरसायकलवर ट्रिपल सिट बसून जि. चंद्रपूर येथुन मौदा कडे जात असता पोलीस ठाणे हुडकेश्वर हड्डीत गब्ब धब्याजवळ, हैद्राबाद जबलपूर हायवे रोडवर भंडारा कडुन येणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाने त्याचे ताव्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून आकाश दुर्गाप्रसाद जांभुळकर यांचे मोटरसायकलला धक्का देवून पळून गेला. अपघात मध्ये आकाश दुर्गाप्रसाद जांभुळकर वय २६ वर्ष व सासरा नामे राजाराम नानाजी दुर्गे वय ५५ वर्ष व पत्नी नाम निर्धरा आकाश जांभुळकर वय २७ वर्ष हे सर्व खाली पडल्याने गंभीर जख्मी झाल्याने त्यांना उपचारकामी मेडीकल हॉस्पीटल येथे नेले असता तेथे डॉक्टरांनी १) आकाश दुर्गाप्रसाद जांभुळकर वय २६ वर्ष २) सासरा नामे राजाराम नानाजी दुर्गे वय ५५ वर्ग यांना तपासून मृत घोषीत केले व पत्नी निर्धरा आकाश जांभुळकर यांचा उपचार सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी सरकार तर्फे पोउपनि बाळु गोरोबा राठोड पोलीस ठाणे हुडकेश्वर यांनी अज्ञात आरोपी ट्रक चालकाविरुद्ध कलम २७९ ३०४(२), ३३८, भा.द.वी सहकलम १३४, १८७ मोका अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत आहे. पुढील तपास सुरू आहे..
प्राणांकीत अपघात करणाऱ्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com