नागपूर :- दिनांक १६.०५.२०२४ चे १८.४५ वा. चे सुमारास, फिर्यादीचा मुलगा नामे विजय विलास गेडाम वय २१ वर्ष रा. कोईराली तिरोडी. ता. तिरोडी, जि. बालाघाट, जि. मध्य प्रदेश हा नागपुर येथे एरनगाव वैधील बारूद कंपनीमध्ये रोज मजुरीचे काम करीत होता. तो त्याचे पल्सर गाडी क. एम. एच ३१ सि.ट्रेड ७८४१ ने सोबत कंपनीमध्ये काम करणारे त्याचे मित्र राकेश शंकर मरस्कोल्हे वय ३७ वर्ग रा. कोईराली व अहाल निशाद वय ५५ वर्ष रा. दलीता छत्तीसगढ़ असे नागपूर वरून पोलीस ठाणे हिंगणा हद्दीतुन एरन गाव ते कवडस रोडने गावाकडे परत जात असता कोणीतरी अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीचे मुलाचे पल्सर गाडीला धडक देवुन पळुन गेला. अपघातामध्ये फिर्यादीचा मुलगा व त्याचे दोन मित्र हे वाहनासह खाली पडुन गंभीर जखमी झाल्याने, त्यांना उपचाराकामी मेडीकल हॉस्पीटल येथे नेले असता तेथे डॉक्टरांनी फिर्यादीचे मुलास तपासून मृत घोषीत केले, राकेश मरस्कोल्हे व अहाल निशाद यांचा उपचार सुरू आहे.
याप्रकरणी फिर्यादी विलास कोडकू गेडाम, तय ४५ वर्ष, रा. कोईराली तिरोडी. ता. तिरोडी, जि. बालाघाट, जि. मध्य प्रदेश यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे हिंगणा येथे पोहवा. हरीषचंद्र यांनी अज्ञात आरोपी वाहन चालकाविरूध्द कलम २७९, ३३८, ३०४(अ) भा.द.वि., सहकलम १३४, १८४, १७७ मो.वा.का अन्वये गुन्हा दाखल करून, पुढील तपास करीत आहे.