नागपूर :- दिनांक १९.०८.२०२३ चे ०७.३० वा. चे सुमारास फिर्यादी सैय्यद नगमान सैय्यद रशीद वय ३८ वर्ष, रा. प्लॉट नं. ५१ पोस्ट ऑफीसमागे तिसरी गल्ली मानकापूर नागपुर, हे आटोचालक असून त्यांनी त्यांचा अँटो पोलीस ठाणे सिताबर्डी हदीत मानस चौक बसस्टॉप जवळ, सवारी घेणे करीता लावला असता, आरोपी क. १) निसार २) रज्जाक यांनी संगणमत करून फिर्यादीस या ठिकाणावरून अॅटोत सवारी भरायचे नाही, असे म्हणून फिर्यादीसोबत भांडण करून, फिर्यादीस लाकडी दांडयाने डावे हातावर मारून गंभीर जखमी केले. जखमीचा उपचार मेयो हॉस्पीटल येथे करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो. ठाणे सिताबर्डी येथे सपोनि बेडवाल यांनी आरोपी विरुध्द कलम ३२५, ३४ भादवि अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध घेणे सुरू आहे. पुढील तपास सुरू आहे.