नागपूर :- फिर्यादीची आई नामे निर्मला गेंदलाल फुन्ने, वय ५६ वर्षे, रा. प्लॉट नं. ८३, पंचशील नगर, ईसासनी रोड, नागपुर हया पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीत हिंगणा रोड, तकीया वाले बाबा दर्गाह समोरील रोडवरून पायदळ घरी जात असता, एका अज्ञात चार चाकी कारचे चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून, फिर्यादीचे आईला धडक देवुन त्यांना गंभीर जखमी करून पळुन गेला, जखमी यांना उपचाराकरीता लता मंगेशकर हॉस्पीटल हिंगणा येथे नेले असता, डॉक्टरांनी तपासुन मृत घोषीत केले
याप्रकरणी फिर्यादी संजु गेंदलाल फुन्ने वय ३२ वर्ष रा. एॉट नं. ८३, पंचशील नगर, ईसासनी रोड, नागपूर यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. येथे पोउपनि, राउत यांनी आरोपीविरूध्द कलम २८१, १०६(१) भाल्या.सं., सहकलम १३४, १७७, १८४ मो.वा.का. अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.