– महायुती सरकारचे पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे अभिनंदन
नागपूर :- राज्यातील सर्वच घटकांना आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून शुक्रवारी सादर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारकडून शेवटच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. मागेल त्याला सौरऊर्जा पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौरऊर्जा पंप उपलब्ध करून देण्याच्या निर्णय. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जाहीर केली असून या योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये प्रतिमहिना मिळणार आहेत. तसेच मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेअंतर्गत पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहेत. राज्यातील ५२ लाख १६ हजार ४१२ लाभार्थी कुटुंबांना त्याचा लाभ होणार आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी हे अभिमानास्पद पाऊल आहे. तसेच गरिबांना आधार मध्यमवर्गीयांना दिलासा उद्योगांना उभारी आणि पायाभूत सुविधांना उत्तेजन देणारा असा हा अर्थसंकल्प आहे. शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, कामगार, महिला व युवक अशा सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रीया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली. एकंदरीत प्रामाणिकपणे सर्व घटकांना न्याय देणाऱ्या अर्थसंकल्प महायुती सरकारचे पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे स्वागत करण्यात आले आहे.
प्रसिद्धी पत्रकाद्वारे बोलताना जयदीप कवाडे म्हणाले की, राज्याच्या एकूण खर्चासाठी ६ लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अर्थसंकल्पात रोजगारनिर्मितीसंबंधी अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. रोजगारनिर्मितीचे प्रचंड लक्ष्य सरकारने ठेवले असून तरुण वर्गावर विशेष लक्ष दिले गेले आहे. तसेच बळीराजाचे हाथ बळकट करण्यासाठी आर्थिक सक्षमतेवर भर देण्यात आला आहे. राज्याच्या विकासाला प्रगतीपथावर घेऊन जाणाऱ्या विविध घोषणा यात करण्यात आल्या आहेत. करात सवलत, उद्योगांना पाठबळ, वंचित घटकांना प्राधान्य, उद्योग आणि शेतीसाठी पायाभूत सुविधा अशा अनेक विचार करण्यात आला आहे. शेतकरी, युवक उद्योजक, गरीब मध्यमवर्गीय महिला, विद्यार्थी अशा सर्व समजाघटकांना बळ देतानाच देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी भक्कम पावले टाकनारा अर्थसंकल्प अजित पवारांनी आज सादर केला. एकंदरीत महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सर्वांना न्याय देणार, सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रीया पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी केली. पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले आहे.