बिडगावात टिप्पर च्या धडकेने सायकलवर जाणाऱ्या बहीण भावाचा जागीच मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- कामठी तालुक्यातील बिडगाव परिसरात कचरा उचलणाऱ्या टिप्परने सायकलवर जाणाऱ्या बहीण-भावाला चिरडले. अंजली नैणीलाल सैनी वय 20 वर्षे व सुमित नैणीलाल सैनी वय 15 वर्षे दोन्ही राहनार अंबेनगर, बिडगाव असे मृत्यू पावलेल्याची नावे आहेत.

घटना घडताच संतप्त जमावाने त्वरित घटनास्थळ गाठून  दगडफेक करत ट्रक पेटवल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी येथे तगडा बंदोबस्त लावत राज्य राखीव दलाच्या पोलिसांनाही पाचारण केले होते.

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भांडेवाडी डम्पींग यार्ड आहे. या परिसरात कचरा उचलणाऱ्या टिप्परची सतत रेल-चेल असते. दरम्यान बिडगाव चौकात सायकलवरून जात असलेल्या अंजली आणि सुमित यांना कचरा उचलणाऱ्या भरधाव टिप्परने जोरदार धडक दिली.यावेळी हे दोन्ही बहीण भाऊ टिप्परच्या चाकाखाली सापडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी होती. घटनेनंतर संतप्त जमावाने टिप्परला आग लावली. घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. टिप्परला लागलेली आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या वाहनाला पाचारण केले गेले. परंतु संतप्त नागरिकांनी अग्निशमन दलाच्या वाहनावरही दगडफेक करून त्या वाहनाच्या काचा फोडल्या. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. जमाव संतप्त होत असल्याचे पाहून राज्य राखीव दलाच्या जवानांना पाचारण केले गेले. यावेळी पोलिसांनी मृतदेहांचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकल रुग्णालयात पाठवले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री दत्तात्रैय प्रभुच्या पालखी यात्रेने दुमदुमले कांद्री शहर

Fri Dec 29 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – हरिनाम भागवत सप्ताह कार्यक्रमाने श्री दत्तात्रैय जयंती महोत्सव संपन्न.  कन्हान :- कांद्री येथे श्री दत्तात्रैय जयंती महोत्सव निमित्य बुधवार (दि.२०) ते बुधवार (दि.२६) डिसेंबर पर्यंत असे सात दिवसीय हरिनाम भागवत सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करुन विविध कार्यक्रम, पालखी यात्रा काढुन महाप्रसाद कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता करीत श्री दत्तात्रेय जयंती उत्साहाने थाटात साजरी करण्यात आली. बुधवार (दि.२०) डिसेंबर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com