अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते ‘अनलॉक’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

नागपूर : नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या इंक-एन-पेन पब्लिकेशनच्या ‘अनलॉक-२०२१’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते व मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत उद्गीर येथे मंगळवारी (ता. २३) करण्यात आले.

उदगीर येथे पुढील वर्षी साहित्य संमेलन आयोजित करण्याबाबत जागेची पाहणी आणि उदगीर शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्यासह राज्यभरातील साहित्य महामंडळाचे सदस्य बैठकीला उपस्थित होते. या बैठकीतच नागपूर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘अनलॉक’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘अनलॉक’ या दिवाळी अंकाची यावर्षीच संकल्पना ‘समूहा’वर आधारित असून राज्यातील अनेक दुर्लक्षित समूहांचे जगणे यात चितारले आहे. अंकाच्या प्रबंध संपादक मुक्त पत्रकार रश्मी पदवाड-मदनकर असून वरिष्ठ पत्रकार आनंद आंबेकर (आनंद स्मिता) हे अंकाचे संपादक आहेत. या संपादकद्वयींच्या संकल्पनेतून चितारलेल्या अंकाचे अतिथी संपादक लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आहेत.

महाराष्ट्रात शेकडो दर्जेदार दिवाळी अंकांची मेजवानी वाचकांना मिळत असते. मात्र, काही अंकांनी आजही आपले वेगळेपण जोपासले आहे. वाचक आवर्जून काही अंकांची आजही मागणी करतात. ‘अनलॉक-२०२१’ दिवाळी अंकाने पहिल्या दोन वर्षांतच वाचकांच्या मनात स्थान मिळविले आहे. अंकांतील साहित्याची निवड आणि अंकाचा आकर्षकपणा ह्या ‘अनलॉक’च्या उजव्या बाजू असून पदार्पणातच मानाचे पुरस्कार मिळविणे, ही अभिमानास्पद बाब आहे. मराठी भाषेत अंकांचा असा दर्जा असणे, ही मराठीसाठीसुद्धा अभिमानाची बाब असून यासाठी संपादकीय मंडळ आणि ‘अनलॉक’ची संपूर्ण चमू अभिनंदनास पात्र असल्याचे गौरवोद्‌गार अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी काढले.

करणाऱ्या नागपूरच्या मुक्तपत्रकार रश्मी पदवाड या अंकाच्या प्रबंध संपादक आहेत, वरीष्ठ पत्रकार श्री आनंद स्मिता हे संपादक आहेत.. त्यांच्याच संकल्पनेतून हा अंक चितारला आहे.. या अंकाचे अतिथी संपादक लातूरचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील आहेत…!!

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

विरा फाउंडेशन की ओर से नि:शुल्क चश्मे वितरण। 

Wed Nov 24 , 2021
काटोल –  सामाजिक संस्था वीरा फाउंडेशन काटोल ने हाल ही में आंखों की जांच की और जरूरतमंदों को चश्मे का वितरण किया।  इस दौरान कई जरूरतमंद लोगों को नि:शुल्क चश्मे का लाभ मिला और नागरिकों ने संस्था के प्रति संतोष व्यक्त किया.  364 जरूरतमंद लोगों को चश्मे बांटे गए।         पूर्व पं.स. सदस्य सौ  निलीमताई ठाकरे तथा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com