14 वर्षोय मुलाचा गळफासने मृत्यु

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मोंढा रहिवासी 14 वर्षीय मुलाचा राहत्या घरात खेळता खेळता कपडे ठेवण्याच्या नॉयलॉन दोरीने गळफास लागल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना आज सकाळी 10 .45 वाजता घडली असून मृतक मुलाचे नाव चिन्मय नेवारे वय 14 वर्षे रा मोंढा कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर 14 वर्षीय मृतक बालक हा आपल्या 9 वर्षोय लहान भावासोबत खेळत असता आईने आंघोळीला बोलावले तरीही परत न आल्याने आईने जाउंन बघितले तर मुलगा गळफास अवस्थेत दिसल्याने आईने एकच हंबरडा फोडला. मृतक मुलाचे वडलाचे पूर्वीच निधन झाले आहे.मृतकाच्या पाठीमागे आई व एक लहान भाऊ असा आप्तपरिवार आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन मृतकाच्या पार्थिवावर शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी तूर्तास घटनेची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पीक कर्ज वाटप येत्या दोन महिन्यात पूर्ण करा ; खरीप हंगाम आढावा बैठकीत विभागीय आयुक्त बिदरी यांचे निर्देश

Thu Jun 13 , 2024
Ø पीक नुकसान प्रलंबित निधी वाटप पूर्ण करा Ø अनधिकृत कापूस बियाणे विक्री संदर्भात विभागात 9 गुन्हे दाखल Ø दुष्काळ सदृष्य भागात शेतकऱ्यांना प्राधान्याने सवलती द्या नागपूर :- खरीप हंगामात नागपूर विभागातील शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप लक्षांक जून महिन्याअखेर 70 टक्के आणि उर्वरित जूलै महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी जिल्ह्यांना दिले. ई-केवायसी व अन्य तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com