व्यवसायकर ई- रिटर्न करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करा

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी

व्यवसायकर उपायुक्त यांच्याकडे विदर्भ मुख्याध्यापक संघाची मागणी. 

शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली चर्चा.

कन्हान : – अनुदानित शाळांना गेल्या पाच वर्षांचे व्यवसायकराचे रिटर्न भरण्यासाठी व्यवसायकर विभागाने विशेष शिबिराचे आयोजन करावे, अशी आग्रही मागणी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष, शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने व्यवसायकर उपायुक्त श्रीमती शिला मेश्राम यांच्याकडे आज (ता १८) केली.
व्यवसायकर विभागा तर्फे ६ मे २०२२ रोजी पत्र काढून सर्व अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक, तंत्रमाध्यमिक शाळा महाविद्यालये यांना व्यवसायकराचे ई- रिटर्न भरण्यासाठी फर्मान काढले आहे. यामुळे मुख्याध्यापक वर्गाची मोठ्या प्रमाणात भर उन्हात धावपळ सुरू आहे. व्यवसायकर विभागा तर्फे २०१७ – २०१८ मध्ये व्यवसायकराचे ई- रिटर्न फाईल करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले होते. बुक अँडजेस्टमेंट मुळे शाळांनी सन २०१७ पासून ई- रिटर्न भरले नाही. मात्र अचानक आलेल्या पत्राने तसेच प्रतिवर्ष १००० रुपये दंडाने मुख्याध्यापक वर्ग हादरला आहे. शासनाने गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असलेल्या ई-रिटर्न साठी अभय योजना २०२२ आणली आहे. मात्र या योजनेची अंमलबजावणी योग्य रितीने होत नाही. अनेक शाळांचे प्रोफाइल बनले नाहीत, प्रोफाईल बनल्यावर ईमेल येत नाही, त्यामुळे पासवर्ड मिळत नाही. यासारख्या अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी संदर्भात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ) संलग्न विदर्भ मुख्याध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष व शिक्षक नेते मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने व्यवसायकर उपायुक्त मेश्राम  यांची भेट घेऊन त्यांना या त्रुटीची माहिती करून दिली. तसेच मुख्याध्यापकां ना होणारा त्रास लक्षात घेता विशेष शिबिराचे आयोज न करण्याची मागणी केली. यावेळी व्यवसायकर उपा युक्त शिला मेश्राम यांनी त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले असून सर्व शाळांनी तातडीने व्यवसायकराचे ई- रिटर्न फाईल करण्याचे आवाहन केले. या बैठकीला नागपूर विभागीय सचिव व मुख्याध्यापक संघाचे निमंत्रक  खिमेश बढिये, ग्रामीण जिल्हा संघटक  गणेश खोब्रागडे, व्यवसाय कर अधिकारी  प्रमोद पिंगे, मुख्याध्यापक संघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष धिरज यादव, विभागीय महिला संघटक  प्रणाली रंगारी, टिईटी जिल्हा संघटक भिमराव शिंदे, मेश्राम उपस्थित होते.
मुख्याध्यापकांनी व्यवसायकर (पी टी) संदर्भा तील अडचणी सोडविण्यासाठी विदर्भ मुख्याध्यापक संघाचे निमंत्रक  गणेश खोब्रागडे यांच्याशी फो न ८९९९६८५०९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन शिक्षक नेते  मिलिंद वानखेडे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

डेंग्यूचा प्रसार हा एजीपटाय नावाच्या डासांमुळे -डॉ चोखांद्रे

Fri May 20 , 2022
संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 20:-राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दरवर्षी 16 मे हा दिवस ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’म्हणून साजरा करण्यात येतो तर डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणूमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा एजिपटाय नावाच्या डासांमुळे होतो सदर डासांची उत्पत्ती ही साठलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी हे आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवू नये याची सर्व नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!