संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान : – शहर विकास मंच कन्हान द्वारे आद्य मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यां च्या १७६ व्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोज न करून त्याच्या प्रतिमेला मालार्पण करून भावपुर्ण श्रध्दाजंली अर्पण करित अभिवादन करण्यात आले.
बुधवार (दि.१८) मे ला प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान समोरील ग्रीन जीम परिसरात आद्य मराठी पत्र कारीतेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या १७६ व्या पुण्यतिथी निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे प्रामुख्याने उपस्थित वरिष्ठ पत्रकार कमलसिं ह यादव, डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते, मंच मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रूंघे यांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्व लित करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित शहर विकास मंच च्या पदाधिका -यांनी, पत्रकार बांधवांनी व नागरिकांनी आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून दोन मिनटाचा मौनधारण करित भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण व अभिवादन करून आचार्य बाळशास्त्री जांभे कर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसं गी ग्रामिण पत्रकार संघ नागपुर जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम रहाटे, कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव सुरज वरखडे, कोषा ध्यक्ष महेश शेंडे, हरीओम प्रकाश नारायण, रवि दुपारे, आकाश पंडितकर, रोहित मानवटकर सह नागरिक उपस्थित होते.