संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 15:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी तालुक्यातील आवंढी गावात निलेश वाघमारे नामक व्यक्तीची गावातील रहिवासी तीन आरोपीने खून केल्याची घटना 9 जुलै 2014 ला घडली होती.या खुन प्रकरणातील ज्ञानेश्वर गेचोडे,संजय ऐंडे, सुधीर पौणिकर या तिन्ही आरोपीना नागपूर च्या सत्र न्यायालयाने 30 नोव्हेंबर 2016 ला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होतो.या निर्णयाविरोधात आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली असता उच्च न्यायालयाने सदर तिन्ही आरोपीना निर्दोष ठरविले होते मात्र फिर्यादी मृतक पत्नी सुनीता निलेश वाघमारे ने या न्यायालयीन निर्णयाविरोधात न्यायिक मागणीसाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून सुप्रीम कोर्टाने अपील याचिका मंजूर करीत सदर तिन्ही आरोपीना सुप्रीम कोर्टाची नोटीस बजावली आहे.
सदर निलेश वाघमारे खून प्रकरणात आरोपीनी सत्र न्यायालयाने दिलेल्या आजीवन कारावसाच्या शिक्षेच्या या निर्णयाविरुद्ध नागपूर च्या उच्च न्यायालयात धाव घेत अपील केली असता उच्च न्यायालयाने 2017 मध्ये प्रत्यक्ष साक्षीदार व न्यायालयातील साक्ष पुराव्याच्या आधारे सदर तिन्ही आरोपीना दोषमुक्त(निर्दोष) केले होते.उच्च न्यायालयाने हा निर्णय प्रत्यक्ष साक्षीदार व न्यायालयातील साक्ष पुराव्याकडे दुर्लक्ष करून आरोपीना निर्दोष ठरविल्याचा आरोप करीत न्यायिक लढा पुढे करीत मृतक निलेश वाघमारे ची पत्नी फिर्यादी सुनीता निलेश वाघमारे ने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली.या अपील याचिकाद्वारे सुप्रीम कोर्टाने या अपील याचिलेला मंजुरी प्रदान करीत महाराष्ट्र राज्य शासन व आरोपी ज्ञानेश्वर केशवराव गेचोडे, संजय हिरामण ऐंडे,सुधीर पांडुरंग पौणिकर ला नोटीस बजावल्या आहेत.सुप्रीम कोर्टात मृतकाची पत्नी फिर्यादी सुनीता निलेश वाघमारे व वरिष्ठ वकील प्रतीक बांबोर्डे यांनी बाजू मांडली.
आवंढी च्या निलेश वाघमारे खून प्रकरणातील आरोपीना सुप्रीम कोर्टाची नोटीस
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com