नागपूर, दि. ११: विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गो-हे या उद्या शनिवार, दि. १२ मार्च रोजी नागपूर दौ-यावर येत आहेत.
नीलमताई गो-हे यांचे सकाळी साडेआठ वाजता नागपूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर सकाळी सव्वाअकरा वाजेपर्यंत राखीव. सकाळी सव्वाअकरा वाजता एनबीएसएस सभागृह, अमरावती रोड येथे आयोजित विदर्भ स्तरीय सामूहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभाव्दारे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेची यंत्रणा म्हणून वने व जलआधारित शाश्वत उपजीविका निर्मिती व शासन निर्णयाची अंमलबजावणी संदर्भात कार्यक्रमास उपस्थिती. यानंतर कार्यक्रमस्थळी त्यांची पत्रकार परिषद होईल.
त्यानंतर दुपारी चार वाजता रविभवन येथे विविध संघटना व सामाजिक संस्था यांच्यासमवेत बैठक होईल. त्यानंतर स्वातंत्र्यसैनिक लिलाताई चितळे यांची सदिच्छा भेट तसेच गणेश टेकडी येथील दर्शन व रात्री ९:२५ वाजता विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.