– संदीप कांबळे,कामठी
स्लग-लाभार्थ्याना धान्य मिळेना;स्वस्त धान्य दुकानदारांची कोंडी
कामठी ता प्र 27:- कामठी तालुक्यातील गोरगरिबांचे एक आधार केंद्र म्हणून ज्याच्याकडे बघितले जाते त्या स्वस्त धान्य दुकानातील धान्य वितरण व्यवस्थेचा मागील एक आठवड्या पासून खोळंबा झाला असून लाभार्थ्याना दर दिवस स्वस्त धान्य दुकानाकडे फेऱ्या माराव्या लागत आहेत. तरीही धान्य नेमकं केव्हा मिळेल याबाबत कोणी निश्चित सांगावयास तयार नाही त्यामुळे दुकानदारांची ही कोंडी होऊन ग्राहक व दुकानदारात शाब्दिक बाचाबाची होण्याचे प्रमाण वाढले आहे.
सरकारी स्वस्त धान्याच्या दुकानात शेतमजूर,मजूर, शेतकरी, गरजू स्वस्त धान्य मिळते म्हणून महिन्याला धान्य खरेदी करण्याकरिता व पॉश मशीनवर आपले बोटाचे ठसे देऊन धान्य घेतो परंतु मागिल एक आठवड्यापासून या मशीनवर बोटाचे ठसे ठेवले तर पुन्हा प्रयत्न करा असा मेसेज येतो व त्यामुळे सरकारी धान्य विक्रेता धान्य देऊ शकत नाही .पॉस मशीनवर ठसे घेतल्यावरच धान्य द्यावे लागते .पॉस मशीनवर नोंद होईपर्यंत धान्य देता येत नाही मात्र मशीन चा सर्व्हर डाऊन असल्याचे कारण सांगून लाभार्थ्याना धान्य वितरण पासून वंचित राहावे लागत आहे.
यासंदर्भात काही स्वस्त धान्य दुकानदारांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ई-पॉस मशीनवर लाभार्थ्यांचा अंगठा कमी वेळात स्कॅनिंग होत असून काही वेळा तर अर्धा अर्धा तास लागत आहे.जोपर्यंत ही समस्या सुटत नाही तोपर्यंत लाभार्थ्याना वेळेवर धान्य मिळत नाही ,कारण सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे असे सांगण्यात येत आहे .मात्र अशा अवस्थेत काही गोरगरीब लाभार्थ्यांच्या घरातील धान्य संपुन गेले असल्यास आर्थिक चणचणीमुळे बाजार भावाचे धान्य कसे खरेदी करावे ?असा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.
बॉक्स:-पुरवठा अधिकारी संदीप शिंदे
—मागील एक आठवड्यापासून दिल्लीहून होणाऱ्या ऑनलाइन प्रणालीमुळे स्वस्त धान्य दुकान दाराकडे असलेल्या बायोमेट्रिक मशीन मध्ये तंत्रिकीय बिघाड आला असून हा बिघाड अजून जवळपास चार दिवस कायम राहणार असल्याचे सांगण्यात येते .ही तांत्रिक बाब असल्याचे गृहीत धरून स्वस्त धान्य दुकानदाराकडे डोकेदुखी करण्यात काही अर्थ नाही .
बॉक्स:-स्वस्त धान्य दुकानदार गीतेश सुखदेवें–मागील पाच ते सहा दिवसापासून सर्व्हर डाऊन च्या नावावर बायोमेट्रिक मशीन बरोबर काम करोत नसल्याने धान्य देताना मोठी अडचण होत आहे.लाभार्थ्यांचा अंगठा मशीनवर उंमटतच नाही .कोणीही ग्राहक या तांत्रिक कारण असल्याचे समजून न घेता जो तो लाभार्थी आम्हाला टार्गेट करीत आहे.शासनाने यावर पर्याय शोधून धान्य वितरणाबाबत योग्य ती व्यवस्था करावी…
बॉक्स:-नागसेन गजभिये(लाभार्थी)- सर्व्हर डाऊन च्या नावाने मशीनवर ठसे उमटत नसल्याचे कारण सांगून धान्य दुकानातून धान्याची उचल करण्यात येत नाही तेव्हा ही तांत्रिक बिघाड असे पर्यंत लाभार्थी धान्य उचल करण्यापासून वंचित न राहावे यासाठी कोरोना काळात लाभार्थ्यांचा पॉस मशीनवर ठसे न ठेवता धान्य दिल्या गेले तसेच आतासुद्धा पॉस मशीन सुरू होईपर्यंत रेशनकार्ड वर धान्य देण्यात यावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली.
कामठी तालुक्यातील स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेचा खोळंबा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com