नागपूर :- गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलींग करीत असतांना, त्यांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत मध्यवर्ती रेल्वे स्थानक नागपूर समोर, पश्चिम गेट बाहेर, ऑटो स्टॅण्ड चे बाजुला सापळा रखुन संशयीत ईसम व महिला यांना चांबवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांचे नाव १) जसबीरसिंग पयूसिंग वय २८ वर्ष रा. हेलक, ता. कुमेर, जि. भरतपुर, राजस्थान २) महेशकुमार महेन्द्रसिंग सोबरवाल वय ३६ वर्ष रा. सेवर, भरतपूर, राजस्थान ३) अनुपम राममोहन सिंग रा. गोपालगढ़ कॉलोनी, भरतपूर, राजस्थान ४) भारत मिट्टू वय २८ वर्ष रा. मुलालकुंड, भरतपूर, राजस्थान, महिला नामे ५) शबाना उर्फ मोना मकसूद लोधी वय २५ वर्ष ६) बबीता अशोक ठाकुर वय २८ वर्ष दोन्ही रा. संतोषी नगर, रायपूर, छत्तीगढ ७) नेहा विजय सिंग वय २९ वर्ष रा. रावतपूरा कॉलोनी, रायपुर, छत्तीसगढ़ असे सांगीतले. त्यांचे जवळील तिन लगेज ट्रॉलीची पंचासमक्ष झडती घेतली असता, तिन्ही ॉलीतील गोन्यांमध्ये एकुण २५ किलो गांजा मिळून आला. आरोपीचे ताब्यातुन गांजा, ६ मोवाईल फोन व ट्रॉली असा एकुण ५,६३,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना अधिक विचारपुस केली असता त्यांनी त्यांचा साथीदार पाहीजे आरोपी नामे पंडितजी उर्फ लड्डू रा. छत्तीसगढ़ बॉर्डर याने मदतीने नमुद गांजा विकी करीता आणला असल्याचे सांगीतले, आरोपोंचे कृत्य हे कलम ८ (क), २० (व) (२) (क), २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार होत असल्याने, आरोपींविरूध्द पोलीस ठाणे सिताबर्डी येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाई कामी सिताबर्डी पोलीसांचे ताब्यात दिल आहे. पाहीजे आरोपीचा शोध व पुढील तपास सुरू आहे.
वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपुर शहर, निसार तांबोळी सह. पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपुर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन),अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोनि. गजानन गुल्हाने, सपोनि, मनोज घुरडे, पोहवा. विजय यादव, मनोज नेवारे, पवन गजभिये, शैलेष डोबोले, विवेक अडाऊ, नापोअं, अरविंद गेडेकर, गणेश जोगेकर, पोअं, सुभाष गजभिये, रोहीत काळे, सहदेव चिखले, अमन राऊत व मपोहवा. अनुप यादव यांनी केली.