नागपूर :- धनोजे कुणबी समाजातील स्थापित उद्योजकांचा अराजकीय समुह असलेल्या डीके फॅन्सच्या वतीने आमदार सुधाकर अडबले, आमदार संजय देरकर आणि आमदार देवराव भोंगळे या नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार नुकताच करण्यात आला.
हॅाटेल सेंटर पॅाईंट येथे आयोजित या कार्यक्रमाला धनोजे कुणबी समाजातील अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदविली. या कार्यक्रमाचे संचलन गायत्री ताजने यांनी केले. यावेळी डॅा. अभय दातारकर, प्रमोद कोरडे, सतीश आवारी, गजेंद्र आसुटकर, ॲड. नितीन कोंगरे, डॅा. आकाश बलकी, डॅा. आशिष बदखल, प्रफुल्ल वाहदुले आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश आसुटकर, कैलाश आडकीने, ऊमेश बदकी, मिलिंद बदकी, दिलीप दोडके, कैलाश डाखळे, अनिल गोवारदिपे, प्रशांत घोडमारे, विजय काळे, अनिकेत खिरकेकर, दिलिप माथनकर, विवेक मोवाडे – जीवतोडे, देवेंद्र मत्ते, राहुल रोडे, धनंजय ताजने, सुरज ताजने, निलेश ताजने, अजय ठेंगने आदींनी अथक परिश्रम घेतले.