नवी मुंबई :- केंद्रिय आयुष मंत्रालयाच्या वतीने दि. 26 नोव्हेंबर 2024 ते 25 डिसेंबर 2024 या कालावधीत ‘देश का प्रकृती प्ररीक्षण’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात ‘आयुष’ मंत्रालयांतर्गत असलेली महाविद्यालये आणि रुग्णालयातील वैद्य, स्वयंसेवक आपल्याकडे येऊन संबंधित प्रकृती परीक्षण करतील अशी माहिती पोदार वैद्यक महाविद्यालया (आयु)चे अधिष्ठाता यांनी दिली आहे.
देशभरातील संपूर्ण जनतेचे प्रकृती परीक्षण करुन प्रकृतीनुसार आहार कोणता घ्यावा, दैनंदिन जीवनशैली कशी असावी. याबद्दल मार्गदर्शन देण्यासाठी केंद्रिय आयुष मंत्रालयाच्या वतीने संपूर्ण देशभरात ‘देश का प्रकृती परीक्षण’ हे अभियान राबाविण्यात येत आहे. आयुष मंत्रालयांतर्गत महाविद्यालये आणि रुग्णालयातील वैद्य आणि स्वयंसेवकांव्दारे हे परीक्षण करण्यात येत असून, या परीक्षणात प्रकृतीनूसार संभाव्य व्याधी कोणत्या होऊ शकतात, ऋतू बदलामध्ये कोणता आहार-विहार घ्यावा. या संबंधीचे मार्गदर्शन दिले जात आहे. प्रकृती परीक्षण झाल्यावर संबंधीतांना विनामुल्य प्रकृती प्रमाणपत्र दिले जाते.
संपूर्ण देशाच्या स्वास्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा या अभियानात आयुष मंत्रालयांतर्गत येणाऱ्या महाविद्यालये आणि रुग्णालयातील वैद्य, स्वयंसेवक आपल्याकडे येऊन प्रकृती परीक्षण करतील त्यांना आपले सक्रीय योगदान आणि सहकार्य करा. तसेच या अभियानात मोठ्यासंख्येने भाग घ्या. असे आवाहन रा.आ. पोदार महाविद्यालय (आयु) वरळी मुंबईचे अधिष्ठाता वैद्या संपदा संत यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.