कन्हान :- संताजी ब्रिगेड, तेली समाज महासभा व्दारे संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प हार अर्पण व अभिवादन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली.
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती संत संताजी जगनाडे चौक नागपुर येथे संताजी ब्रिगेड, तेली समाज महासभा व्दारे संत संताजी जगनाडे महा राजांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण व अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी संत संताजी महाराजांच्या जिवन गाथेवर उपस्थितांना मार्गदर्शन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी रमेश गिरडे, अजय धोपटे, अरुण धांडे, सूर्यभान चकोले सह बहुसंख्येने समाज भगिनी व बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.